मका प्रक्रिया प्रकल्प लवकर पूर्ण होण्याची आवश्यकता.

Maharastra times
आशिया खंडातील सर्वाधिक मका उत्पादन सिल्लोड तालुक्यात होते. परंतु या तालुक्यात मक्यावर प्रक्रिया होत नाही. शेतकऱ्यांनामिळेल त्या भावाने मका विकावा लागतो. शेतकऱ्यांना जादा भाव मिळावा या उद्देशाने आमदार अब्दुल सत्तार यांनी आघाडी सरकार मध्ये मंत्री असतांना सिल्लोड येथे मका प्रक्रिया प्रकल्प मंजूर करून घेतला आहे.सिल्लोड तालुक्यातील शेतकऱ्यांना वाजवी भाव मिळून रोजगार निर्मिती व्हावी, यासाठी मका प्रक्रिया प्रकल्प पूर्ण करावा अशी सरकारकडून अपेक्षा आहे.