Archive for November, 2014

भाजपा सरकारने बहुमत सिद्ध करावे,तालुका कॉंग्रेस कमिटीची राज्यपालांकडे मागणी.

महाराष्ट्र विधानसभेमध्ये दिनांक १२ नोव्हेंबर रोजी भारतीय पक्षाद्वारे मांडलेल्या विश्वासदर्शक ठरावामध्ये भारतीय घटनेच्या तरतुदीचा भंग झाला असून भारतीय जनता पक्षाने राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी आवश्यक असलेले बहुमत सिध्द केले नाही त्यामुळे राज्यपालांनी या सरकारला पुन्हा बहुमत सिध्द करण्याचे आदेश द्यावेत अशा आशयाचे निवेदन तालुका कॉंग्रेस कमिटीच्या वतीने राज्यपालांना देण्यात आले आहेत. सदरील निवेदनावर अब्दुल सत्तार …

Read More

कॉंग्रेसची आज दुष्काळी परिषद.

शेतकऱ्यांना दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत असून शेतकऱ्यांच्या या दुष्काळी प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी कॉंग्रेस पक्षाने आक्रमक होण्याचे ठरविले असून याचाच एक भाग म्हणून पक्षातर्फे औरंगाबाद येथे विभागीय परिषद आयोजित करण्यात आली आहे.

Read More

कॉंग्रेसच्या वतीने आज मराठवाडा दुष्काळ परिषद.

महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसच्या वतीने मराठवाडा दुष्काळ परिषद व जवखेडा येथील दालितावरील झालेल्या आन्याला वाचा फोडण्यासाठी औरंगाबाद येथे तापडिया- कासलीवाल ग्राउंड येथे मराठवाडा विभागीय बैठक आयोजित केली असून यामध्ये मराठवाड्यातील सर्व कॉंग्रेसचे माजी मंत्री, माजी खासदार, माजी आमदार, जिल्हा परिषद सदस्य व इतर पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीचे संयोजन आमदार अब्दुल सत्तार करणार आहेत.

Read More

भूमी अभिलेख विभागामध्ये विविध ९०३ पदासाठी पदभरती.

भूमी अभिलेख विभागामध्ये विविध ९०३ पदासाठी पदभरती करण्यात येत आहे. त्यासाठी इच्छुक पात्र उमेद्वारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अधिक माहितीसाठी कृपया उमेद्वारानी http://oasis.mkcl.org/landrecords2014 या संकेतस्थळाला शेवट दिनांक १ डिसेंबर २०१४ पूर्वी भेट देवून आपले अर्ज सादर करावेत. अन्य शासकीय नोकरी संदर्भातील अधिक माहितीसाठी कृपया www.abdulsattar.in या संकेत संकेतस्थळाला वेळोवेळी भेट दयावी.

Read More

कोरडवाहू शेती अभियानांचा आ. अब्दुल सत्तार यांच्या हस्ते शुभारंभ.

कोरडवाहू शेती अभियानांतर्गत बहुलखेडा येथील प्रकल्पाचा शुभारंभ आ.अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते करण्यात आला. कोरडवाहू उत्पादकता व उत्पन्न वाढविणे हा या प्रकल्पाचा उद्देश असल्याने प्रत्येक शेतकऱ्याने या प्रकल्पात सहभागी होऊन सहकार्य करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन यावेळी आ.अब्दुल सत्तार यांनी केले आहे.

Read More

मका प्रक्रिया प्रकल्प लवकर पूर्ण होण्याची आवश्यकता.

आशिया खंडातील सर्वाधिक मका उत्पादन सिल्लोड तालुक्यात होते. परंतु या तालुक्यात मक्यावर प्रक्रिया होत नाही. शेतकऱ्यांनामिळेल त्या भावाने मका विकावा लागतो. शेतकऱ्यांना जादा भाव मिळावा या उद्देशाने आमदार अब्दुल सत्तार यांनी आघाडी सरकार मध्ये मंत्री असतांना सिल्लोड येथे मका प्रक्रिया प्रकल्प मंजूर करून घेतला आहे.सिल्लोड तालुक्यातील शेतकऱ्यांना वाजवी भाव मिळून रोजगार निर्मिती व्हावी, यासाठी मका …

Read More

सहकाराने विकास साधणार- आ. अब्दुल सत्तार.

औरंगाबाद जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेच्या वतीने आमदार अब्दुल सत्तार यांना सन्मानित करण्यात आले त्यावेळी ते म्हणाले की, आपण जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सध्या सुरु असलेल्या कामावर खुश आहोत, येणाऱ्या पुढील काही दिवसामध्ये आपण सहकारी क्षेत्रामध्ये सुधारणा करणार असून या माध्यमातून जिल्ह्याचा विकास साधणार आहोत करण बँक हे माध्यम समाज आणि सर्वसामान्य नागरिकांचे समन्वय साधान्याचा प्रयत्न करते.

Read More

अहमदनगर येथे निषेध मोर्चा.

जवखेड येथील दलित कुटुंबावरील हत्याकांडाच्या निषेधार्थ युवक कॉंग्रेसच्या वतीने अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. याप्रसंगी युवक कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. राजीव सताव, अब्दुल समीर अब्दुल सत्तार व अन्य नेते सहभागी झाले होते.

Read More

अब्दुल सत्तार यांचा जिल्हा बँकेत सत्कार.

सिल्लोड-सोयगाव मतदारसंघाचे आमदार अब्दुल सत्तार साहेब यांचा औरंगाबाद येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत सत्कार करण्यात आला. यावेळी इतर मान्यवर ही उपस्थित होते.

Read More

भारतीय स्टेट बँकेत ६४२५ पदासाठी पदभरती.

भारतीय स्टेट बँकेत ६४२५ पदासाठी पदभरती करण्यात येत आहे. त्यासाठी इच्छुक पात्र उमेद्वारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अधिक माहितीसाठी कृपया उमेद्वारानी www.sbi.co.in/ किंवा www.statebankofindia.com या संकेतस्थळाला शेवट दिनांक ९ डिसेंबर २०१४ पूर्वी भेट देवून आपले अर्ज सादर करावेत. अन्य शासकीय नोकरी संदर्भातील अधिक माहितीसाठी कृपया www.abdulsattar.in या संकेत संकेतस्थळाला वेळोवेळी भेट दयावी.

Read More