Archive for April, 2015

आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते प्रचार रथाचे उद्घाटन.

सिल्लोड येथील उपविभागीय कार्यालयात आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते प्रचार रथाचे उद्घाटन झाले. जलयुक्त शिवार अभियानाचा प्रसार, प्रचार व प्रसिद्धी करून लोकसहभाग वाढविण्यासाठी विविध गावांतून प्रचार रथ फिरणार आहे.या योजनेसाठी निवड झालेल्या नागरिकांना योजनेची माहिती दिली जाणार आहे.

Read More

गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्याचे आ. अब्दुल सत्तार यांचे आश्वासन.

आ. अब्दुल सत्तार साहेबांनी सिल्लोड तालुक्यातील विविध गारपीटग्रस्त गावांना भेट देवून परिस्थितीची पाहणी केली. सिल्लोड तालुक्यात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करण्याचे आश्वासन आ. अब्दुल सत्तार साहेबांनी दिले आहे.

Read More

आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या वतीने म्हसोबा यात्रेसाठी दहा ठिकाणी पाणपोईची व्यवस्था.

सिल्लोड येथील ग्राम दैवत श्री म्हसोबा महाराजांच्या यात्रेचे आयोजन शुक्रवार दिनांक ९ एप्रिल रोजी करण्यात आले आहे. याप्रसंगी आ. अब्दुल सत्तार साहेबांनी यात्रेच्या कार्यक्रमाच्या तयारीची पाहणी केली. यात्रेतील भक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या वतीने दहा ठिकाणी पाणपोईची व्यवस्था करण्यात आली आहे. उन्हापासून भाविकांना त्रास होऊ नये यासाठी मंडपाची सुद्धा व्यवस्था करण्यात …

Read More

सिद्धेश्वर अर्बन को-ऑपरेटीव्ह बँक निवडणुकीत पालोदकर गटाचा विजय.

सिल्लोड येथील सिद्धेश्वर अर्बन को-ऑपरेटीव्ह बँक निवडणुकीत आ. अब्दुल सत्तार साहेब व प्रभाकर पालोदकर यांच्या सहकारमहर्षी दादासाहेब पालोदकर सहकार विकास गटाचे सर्वच्या सर्व १३ संचालक मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. या विजयी उमेद्वारांची सोमवारी संध्याकाळी जल्लोषात सिल्लोड शहरातून मिरवणूक काढण्यात आली.

Read More

सिल्लोड येथे महावीर जयंती उत्साहात साजरी.

भगवान महावीर जयंती निमित्त सिल्लोड येथे भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव समितीच्या वतीने भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीस आ. अब्दुल सत्तार साहेबांसोबत अन्य मान्यवरही उपस्थित होते.

Read More

विरोधकांकडून फक्त विरोधासाठी बँकेची निवडणूक- आ. अब्दुल सत्तार.

शिद्धेश्वर अर्बन बँक संचालक मंडळाच्या निवडणुकीतील सहकारमहर्षी दादासाहेब पालोदकर सहकार विकास गटाच्या प्रचारच शुभारंभ सिल्लोड येथे करण्यात आला. त्याप्रसंगी बोलतांना आ. अब्दुल सत्तार साहेब म्हणाले की, विरोधक बँक चालविण्यासाठी नव्हे तर फक्त विरोध करण्यासाठी शिद्धेश्वर बँकेची निवडणूक आहे असा आरोप आमदार अब्दुल सत्तार यांनी जहीर सभेत बोलतांना केला.

Read More

आ. अब्दुल सत्तार साहेबांनी विधान भवनात मांडला औरंगाबाद-जळगाव रस्त्याचा प्रश्न.

जळगाव-सिल्लोड-औरंगाबाद रस्ता अत्यंत खराब झाला असून यामुळे प्रवाशांना व देशविदेशातील पर्यटकांनाही त्रास सहन करावा लागत आहे. शासन यावर लवकर आणि प्रभावी अशा उपाययोजना करणार का? असा प्रश्न आ. अब्दुल सत्तार साहेबांनी विधान भवनात उपस्थित केला व त्याचप्रमाणे यावर उपाय म्हणून या रस्त्यावर २० एमएम जाडीचे डांबरी कार्पेट व सिल्कोट करण्याची मागणी ही त्यांनी केली आहे.

Read More