प्रसिध्दीपत्रक

विरोधकांकडून फक्त विरोधासाठी बँकेची निवडणूक- आ. अब्दुल सत्तार.

शिद्धेश्वर अर्बन बँक संचालक मंडळाच्या निवडणुकीतील सहकारमहर्षी दादासाहेब पालोदकर सहकार विकास गटाच्या प्रचारच शुभारंभ सिल्लोड येथे करण्यात आला. त्याप्रसंगी बोलतांना आ. अब्दुल सत्तार साहेब म्हणाले की, विरोधक बँक चालविण्यासाठी नव्हे तर फक्त विरोध करण्यासाठी शिद्धेश्वर बँकेची निवडणूक आहे असा आरोप आमदार अब्दुल सत्तार यांनी जहीर सभेत बोलतांना केला.

अधिक वाचा

आ. अब्दुल सत्तार साहेबांनी विधान भवनात मांडला औरंगाबाद-जळगाव रस्त्याचा प्रश्न.

जळगाव-सिल्लोड-औरंगाबाद रस्ता अत्यंत खराब झाला असून यामुळे प्रवाशांना व देशविदेशातील पर्यटकांनाही त्रास सहन करावा लागत आहे. शासन यावर लवकर आणि प्रभावी अशा उपाययोजना करणार का? असा प्रश्न आ. अब्दुल सत्तार साहेबांनी विधान भवनात उपस्थित केला व त्याचप्रमाणे यावर उपाय म्हणून या रस्त्यावर २० एमएम जाडीचे डांबरी कार्पेट व सिल्कोट करण्याची मागणी ही त्यांनी केली आहे.

अधिक वाचा

सिद्धेश्वर सहकारी बँकेच्या निवडणुकीत पालोदकर गटाला विजयी करा- आ. अब्दुल सत्तार.

शेतकरी व्यापारी तसेच सर्वसाधारण नागरिकांचा विचार करून आदरणीय माणिकराव पालोदकर यांनी स्थापन केलेल्या व जालना- औरंगाबाद जिल्ह्यातील प्रमुख वित्त संस्था असलेल्या सिद्धेश्वर सहकारी बँकेच्या निवडणुकीत पालोदकर गटाच्या हाती सत्ता द्या असे आवाहन आ. अब्दुल सत्तार साहेबांनी केले आहे.

अधिक वाचा

सिद्धेश्वर सहकारी बँकेच्या निवडणुकीत पालोदकर गटाच्या हाती सत्ता द्या- आ. अब्दुल सत्तार.

सिद्धेश्वर सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ सिल्लोड येथील रामरहीम व्यापार संकुलात प्रचाराची सुरुवात करण्यात आली. यावेळी बोलतांना आ. अब्दुल सत्तार साहेब म्हणाले की सिद्धेश्वर सहकारी बँकेची स्थापना करून कै. दादासाहेब पालोदकरांनी मराठवाड्यात सहकाराची मुहूर्तमेढ रोवली. त्यामुळे त्यांच्या कार्याला महत्व देऊन सिद्धेश्वर सहकारी बँकेच्या निवडणुकीत बँकेची सत्ता सहकार महर्षी दादासाहेब पालोदकर पैनलच्या हाती द्यावी असे आवाहन आ. …

अधिक वाचा

पालोदकरानां साथ देण्याचे आ. अब्दुल सत्तार साहेबांचे बैठकीत आवाहन.

सिद्धेश्वर सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीतीत महर्षी दादासाहेब सहकार विकास गटाच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन प्रचार बैठकीमध्ये आ. अब्दुल सत्तार साहेबांनी केले आहे.

अधिक वाचा

सर्वसामान्य जनतेला निराश करणारा अर्थसंकल्प- आ. अब्दुल सत्तार.

महाराष्ट्राचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सन २०१५-२०१६ ह्या वर्षाचा अर्थसंकल्प सदर केला आहे. या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देतांना आ. अब्दुल सत्तार साहेब म्हणाले की सदरील अर्थसंकल्पात सामान्य व्यक्तीचा विचार केलेला नसून दुष्काळात दिलासा मिळण्याऐवजी निराशाच समान्य माणसाच्या पदरी पडली आहे.

अधिक वाचा

आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते आठवडी बाजाराचे उद्घाटन.

दिनांक १५ मार्च २०१५ रोजी आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते कन्नड तालुक्यातील शेलगाव येथे ग्रामपंचायतीच्या वतीने सुरु होणाऱ्या आठवडी बाजाराचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी बोलतांना आ. अब्दुल सत्तार साहेब म्हणाले की बाजारासाठी खेड्यापाड्यातून येणाऱ्या महिलांना संरक्षण द्यावे व त्याच प्रमाणे बाजाराचे आणि आपल्या गावाचे नाव जाणार नाही याची दक्षता सर्वांनी घ्यावी.

अधिक वाचा

शेतकऱ्यांना त्वरित मदत द्यावी – आ. अब्दुल सत्तार.

सिल्लोड व सोयगाव तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेले असून शासनाने त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी आ. अब्दुल सत्तार साहेबांनी केली आहे.

अधिक वाचा

नागरिकांनी पाण्याचा उपयोग काटकसरीने करावा- आ. अब्दुल सत्तार.

बेमोसमी पावसामुळे झालेल्या नुकसानीची माहिती घेण्यासाठी आ. अब्दुल सत्तार साहेब सोयगाव येथे आले होते. यावेळी उपस्थित शेतकरी व कार्यकार्त्यांशी बोलतांना ते म्हणाले की अत्यंत कमी पाऊस पडल्याने यावर्षी पिण्याच्या पाण्याची अत्यंत तीव्र टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. म्हणून या जलसंकटावर मात करण्यासाठी नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरावे असे आवाहन आ. अब्दुल सत्तार साहेबांनी जनतेला केले आहे.

अधिक वाचा

अशोक चव्हाण साहेबांनी स्वीकारली प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे.

मुंबई येथे माजी मुख्यमंत्री व खा. अशोकरावजी चव्हाण साहेब यांनी महाराष्ट्र कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला त्यावेळी आ. अब्दुल सत्तार साहेब व कॉंग्रेस पक्षाचे इतर मान्यवर उपस्थित होते.

अधिक वाचा