प्रसिध्दीपत्रक

दर्गा समितीच्या वतीने आ. अब्दुल सत्तार साहेबांचे स्वागत.

दर्गा समितीच्या वतीने खुलताबाद येथील उरुसाचे औचित्य साधून माजी मंत्री व सिल्लोड-सोयगावचे आमदार अब्दुल सत्तार साहेबांचे स्वागत करण्यात आले. आ. अब्दुल सत्तार साहेबांसोबत अब्दुल रहमान, शराफोद्दीन रमजनी, कैसरोद्दीन, अनीस जहागीरदार, मुजिबोद्दीन व अन्य मान्यवर दिसत आहेत.

अधिक वाचा

दर्पण दिनानिमित्त पत्रकारांचा सन्मान.

दर्पण दिनाचे औचित्य साधून सिल्लोड येथील शासकीय विश्रामगृहामध्ये पत्रकार बांधवांचा शाल, हार व भेटवस्तू देउन सत्कार करण्यात आला. यावेळी युवक कॉंग्रेस जालनाचे जिल्हाध्यक्ष अब्दुल समीर, कॉंग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष गणेशमामा दौड, उपनगराध्यक्ष किरण पा. पवार आदी मान्यवर उपस्थित होते. दरवर्षी दर्पण दिनानिमित्त सिल्लोड येथे आ. अब्दुल सत्तार साहेबांतर्फे पत्रकार बांधवांचा सत्कार व गौरव करण्यात येतो. यावर्षी …

अधिक वाचा

जनसंपर्क वाढविणे आवश्यक- आ.अब्दुल सत्तार

तापडिया नाट्यगृह औरंगाबाद येथे प्रदेशाध्यक्ष श्री माणिकराव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मराठवाड्यातील गंभीर दुष्काळ परिस्थितीवर पक्षीय पातळीवर चर्चा करण्यासाठी जिल्हा व शहर कॉंग्रेस कमिटीच्या वतीने दुष्काळी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकी मध्ये बोलतांना आ. अब्दुल सत्तार म्हणाले की, राजकारणात धार्मिक तेढ वाढली असून त्याचा फायदा भाजपा, शिवसेना इत्यादी पक्ष घेत आहेत त्यामुळे हे थांबवून …

अधिक वाचा

जिल्हा कॉंग्रेस कमिटीची दुष्काळावर बैठक.

मराठवाड्यातील गंभीर दुष्काळ परिस्थितीवर पक्षीय पातळीवर चर्चा करण्यासाठी जिल्हा व शहर कॉंग्रेस कमिटीच्या वतीने दुष्काळी बैठक तापडिया नाट्यगृह औरंगाबाद येथे प्रदेशाध्यक्ष श्री माणिकराव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली आहे. या बैठकी मध्ये माजी मुख्यमंत्री खा. अशोक चव्हाण, आ. अब्दुल सत्तार यांच्या सहित कॉंग्रेस पक्षाचे नेते सहभागी होणार आहे.

अधिक वाचा

गांधी भवन सिल्लोड येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी.

समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांची जयंती सिल्लोड येथील गांधी भवन येथे साजरी करण्यात आली या प्रसंगी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार तसेच कॉंग्रेस पक्षाचे इतर कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

अधिक वाचा

सिल्लोड येथे सहा हजार रुग्णांची तपासणी.

आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सिल्लोड येथे राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण समिती औरंगाबाद व नगरपरिषद सिल्लोड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य सर्वरोग निदान शिबीर तसेच मोफत शस्त्रक्रिया व कृत्रिम भिंगारोपण शिबिरांतर्गत सहा हजार रुग्णांची तपासणी करण्यात आली असून ११५ रुग्णांनाचष्मे वाटप करण्यात आले आहेत.

अधिक वाचा

आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते मोफत शिबिराचे उद्घाटन

आ.अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्त सिल्लोड येथे नगरपरिषद सिल्लोड व राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण समिती औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य सर्वरोग निदान शिबीर तसेच मोफत शस्त्रक्रिया व कृत्रिम भिंगारोपण शिबिराचे आयोजन करण्यात आले. बुधवारी या शिबिराचे उद्घाटन आ. अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आले. सदरील शिबिरामध्ये ३०० रुग्णांची तपासणी करून ७५ रुग्णांवर मोफत शत्रक्रिया करण्यात आल्या.

अधिक वाचा

उरूस संदल मिरवणुकीमध्ये आ. अब्दुल सत्तार सहभागी.

खुलताबाद येथील हजरत ख्वाजा शेख मुन्तोजबोद्दिन उर्फ जरजरी जर बक्ष उरुसास संदल मिरवणुकीने सुरुवात झाली. सदरील मिरवणुकीस आ. अब्दुल सत्तार साहेब व इतर मान्यवर उपस्थित होते.

अधिक वाचा

आ. अब्दुल सत्तार साहेबांतर्फे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत.

दुष्काळ व नापिकीला कंटाळून सिल्लोड तालुक्यातील हट्टी येथील शेतकरी काशिनाथ जयाजी जरारे यांनी आत्महत्या केली. याप्रसंगी आ. अब्दुल सत्तार साहेबांनी आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याच्या कुटुंबियांना सांत्वनपर भेट दिली व या कुटुंबास आर्थिक सहाय्य म्हणून वैयक्तिक पन्नास हजार रुपयाच्या मदतीची घोषणाही केली आहे.

अधिक वाचा