राम-रहीम व्यापार संकुल

सिल्लोड शहरातील नगर परिषद इमारतीला लागून असलेल्या जनावरांच्या दवाखान्याची जागा हस्तांतरित करून तेथे न.प. ला व्यापारी संकुल उभारण्यासाठी शासनाने मंजुरी दिली आहे. २ एकर २० गुंठे या जागेवर मोठ्या शहरातील मॉलच्या धर्तीवर ‘राम-रहीमङ्क नावाचे जवळपास ५०० दुकानांचे भव्य व्यापारी संकुल उभारण्यात येईल. शहराच्या मुख्य ठिकाणी ही जागा असल्याने रोजगार निर्मीती व ग्राहकांनाही पर्यायी बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. शिवाय शासनाने नविन विकास आराखड्यामध्ये दुकान केंद्रासाठी आरक्षीत केलेल्या सर्वे नं. १, १५१, १५३ मध्येही सुसज्य व्यापार संकुल उभारण्यात येईल.
वैशिष्ट्यपुर्ण योजना, वित्तआयोग, एकात्मीक शहर विकास योजना, नगोरोत्थान योजनेअंतर्गत यासाठी अंदाजे ३० लाख रुपये खर्च करण्यात येईल.

DSC_7206

नगर परीषदेला लागुन असलेल्या जनावराच्या दवाखाण्याची हीच जागा. या नीयोजीत जागेवर रामरहीम व्यापास संकुल उभारण्यात येईल व न.प. च्या सर्वे नं. ४३ मध्ये अत्याधुनिक पध्दतीचा व सर्वसुविधायुक्त जनावरांचा दवाखाणा उभारण्यात येईल.