अजिंठा येथे शिवसेना व युवासेनेच्या वतीने निर्जंतुकीकरण मोहीम

सिल्लोड तालुक्यातील अजिंठा येथे गेल्या दोन दिवसांपासून कोरोनाचे १३ नवीन रुग्ण वाढले त्या अनुषंगाने कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून राज्यमंत्री अब्दुल सत्तार साहेबांच्या निर्देशाने शिवसेना व युवसेनाच्या वतीने संपूर्ण गांवात निर्जंतुकीकरण करण्यासाठी हायप्लोक्लोराईड व धुर फवारणी करण्यात आली. या उपक्रमाचे उदघाटन राज्यमंत्री अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते सम्पन्न झाला.