अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राज्यमंत्री ना. अब्दुल सत्तार साहेब यांचा मराठवाडा दौरा.

मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले. अनेकांच्या घरांची पडझड झाली तर बऱ्याच शेतकऱ्यांचे पशुधन पाण्यात वाहून गेले. या संपूर्ण नुकसानीचा आढावा घेण्यासाठी राज्यमंत्री ना. अब्दुल सत्तार साहेबांनी मराठवाड्यातील औरंगाबाद सह जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यात थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी नुकसानीची पाहणी करीत शेतकऱ्यांशी संवाद साधला. काळजी करू नका ठाकरे सरकर तुमच्या पाठीशी आहे अशा शब्दांत त्यांनी शेतकऱ्यांना धीर दिला.