आश्रम शाळेच्या बांधकामाचे आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते उद्घाटन.

Punya nagari (2)
आ. अब्दुल सत्तार यांच्या हस्ते १९ फेब्रुवारी रोजी सिल्लोड तालुक्यातील हट्टी येथे शासकीय आदिवासी आश्रमशाळा बांधकामाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी बोलतांना आ. अब्दुल सत्तार साहेब म्हणाले की, आघाडी सरकारने आश्रम शाळांच्या इमारतीसाठी चार कोटी रुपयांची योजना मंजूर केली होती. या आश्रम शाळेमध्ये शिक्षण घेणाऱ्या आदिवासी मुलांना शैक्षणिक सुविधांसाठी निधी कमी पडू देणार नाही असे आश्वासन यावेळी आ. सत्तार साहेबांनी दिले आहे.