औरंगाबाद जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची राज्यमंत्री ना. अब्दुल सत्तार साहेबांनी केली पाहणी.

महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री नामदार अब्दुल सत्तार साहेब यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांचा आढावा घेण्यासाठी औरंगाबाद जिल्ह्याचा दौरा आयोजित केला होता. यावेळी विविध तालुक्यांतील नुकसान झालेल्या पिकांची ना. अब्दुल सत्तार साहेब यांनी पाहणी करीत शेतकऱ्यांशी संवाद साधला. या पाहणी दरम्यान खासदार इम्तियाज जलील, शिवसेना आमदार उदय सिंग राजपूत, आमदार रमेश बोरनारे, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, आदींसह शेतकरी बांधवांची उपस्थिती होती.