ग्रामविकास विभागामार्फत “महाआवास अभियानाचा” शुभारंभ

गरिबांच्या घरांचे स्वप्न साकार करण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या ग्रामविकास विभागांतर्गत “महाआवास अभियानाचा” शुभारंभ मुख्यमंत्री मा.ना.उद्धवजी ठाकरे साहेबांच्या शुभहस्ते संपन्न झाला. यावेळी ग्रामविकास मंत्री ना.हसन मुश्रीफ साहेब, महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री ना. अब्दुल सत्तार साहेब यांची उपस्थिती होती.