महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीतर्फे औरंगाबाद येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्ष समारोह आयोजित करण्यात आला. यावेळी मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर आयोजित समारंभास मल्लिकार्जुनजी खरगे, मा. खा. अशोकराव चव्हाण, आ. अब्दुल सत्तार, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रकांत हंडोरे व इतर कॉंग्रेसचे नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.