धुळे येथे कोरोना विषाणू संदर्भात सध्य स्थिती व त्यावर उपाय योजना करण्यासाठी आढावा बैठक

महसूल, ग्रामविकास राज्यमंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अब्दुल सत्तार साहेब यांनी आज धुळे येथे कोरोना विषाणू संदर्भात सध्य स्थिती व त्यावर उपाय योजना करण्यासाठी  आढावा बैठक घेतली. कोरोनाचा भविष्यातील धोका पाहता खबरदारी चा उपाय म्हणून तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यात यावे अशा सूचना ना.अब्दुल सत्तार साहेब यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. आरोग्य विभागातील रिक्त जागा येत्या दोन दिवसात भरण्यात येणार असल्याचे सांगत नागरिकांनी कोरोनाला रोखण्यासाठी नियमित मास्क चा वापर करीत सोशल डिस्टन्ससिंगचे पालन करावे असे आवाहन ना. अब्दुल सत्तार साहेब यांनी केले