पाण्याचा वापर काटकसरीने करावा- आ. अब्दुल सत्तार

Raj samrat
सिल्लोड विधानसभा मतदार संघामध्ये अत्यंत कमी पाऊस पडल्याने यावर्षी पिण्याच्या पाण्याची अत्यंत तीव्र टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. म्हणून या जल संकटावर मात करण्यासाठी नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन आ. अब्दुल सत्तार यांनी जनतेला केले आहे. ते सिल्लोड येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीमध्ये बोलत होते.