बेळगांव घटनेप्रकरणी सिल्लोड येथे कर्नाटक भाजप सरकारचा निषेध

कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटविल्याने महाराष्ट्र-कर्नाटकसह देशातील शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. सिल्लोड येथे या घटनेचा महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री ना. अब्दुल सत्तार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेच्या वतीने शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात रास्ता रोको करून कर्नाटकाचे मुख्यमंत्री येडीयुरोप्पा यांच्या प्रतिकात्मक फोटोला जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आला.