माजी राज्यमंत्री अब्दुल सत्तार साहेब आणि समर्थकांच्या वतीने मुख्यमंत्री मा.ना.एकनाथरावजी शिंदे साहेब यांचा मुंबई येथे नागरी सत्कार संपन्न.

सिल्लोड मतदारसंघात कोट्यावधी रुपयांच्या विकास कामांना मंजुरी दिल्याबद्दल माजी राज्यमंत्री अब्दुल सत्तार साहेब यांच्यासह हजारो समर्थकांच्या वतीने मुंबई येथील रवींद्र नाट्य मंदिरात मुख्यमंत्री ना.एकनाथरावजी शिंदे साहेब यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा संपन्न झाला. यावेळी आमदार संदीपान भुमरे, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार प्रकाश आबेटकर, अब्दुल आमेर अब्दुल सत्तार आदींसह सिल्लोड-सोयगांव मतदारसंघातील हजारो पदाधिकारी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.