मृत मुलींच्या कुटुंबियांना राज्यमंत्री अब्दुल सत्तार साहेबांकडून आर्थिक मदत

तळेगाव वाडी ता. भोकरदन येथे खेळत असतांना पाच शाळकरी मुलींचा परिसरातील तलावात बुडून मृत्यू झाला. या घटनेनंतर महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री ना.अब्दुल सत्तार साहेबांनी तळेगाव वाडी येथे सांत्वन भेट देऊन मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 20 हजार या प्रमाणे एक लाखाची स्वपदरची मदत दिली व शासनाकडून मदत मिळवून देण्याचे वचन दिले.