राज्यमंत्री ना. अब्दुल सत्तार साहेबांच्या पुढाकाराने फर्दापूर येथे उभारणार शिवस्मारक व भिमपार्क

महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री ना. अब्दुल सत्तार साहेब यांच्या पुढाकाराने सोयगांव तालुक्यातील फर्दापूर येथे अजिंठा लेणी परिसरात भव्य शिवस्मारक तसेच भिमपार्क उभारण्यात येणार आहे. शिवस्मारक व भीमपार्कचे काम गतीने पूर्ण करण्याच्या सूचना राज्यमंत्री अब्दुल सत्तार साहेब यांनी संबंधित अधिकाऱ्यांना वेळोवेळी बैठकीत दिल्या आहेत. जगप्रसिद्ध अजिंठा लेणीच्या पायथ्याशी जागतिक पातळीवर उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारकासाठी फर्दापूर येथे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने 20 एकर जागेला तत्वतः मान्यता दिली आहे. यासाठी स्थळ पाहणी करून जागा निश्चित करण्यात आली असून लवकरच या कामाचे उदघाटन होणार आहे.