राज्यमंत्री ना. अब्दुल सत्तार साहेब मित्र मंडळाच्या वतीने सिल्लोड येथे इफ्तार पार्टी संपन्न.

राज्यमंत्री ना. अब्दुल सत्तार साहेब मित्र मंडळाच्या वतीने सालाबादप्रमाणे सिल्लोड येथे इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.  यावेळी महसूल तथा ग्रामविकास  राज्यमंत्री अब्दुल सतार साहेब व माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या इफ्तार पार्टीत सर्वधर्मीय बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. सामाजिक एकात्मतेचे दर्शन या इफ्तार पार्टीत दिसून आले. यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, विशेष पोलीस महानिरीक्षक मल्लिकार्जुन प्रसन्ना, पोलीस अधिक्षक मनिष कलवानिया, युवानेते अब्दुल समीर आदींसह पदाधिकारी, अधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.