राज्यमंत्री ना. अब्दुल सत्तार साहेबांनी सोयगांव तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची केली पाहणी.

महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री ना. अब्दुल सत्तार साहेबांनी सोयगांव तालुक्यातील विभिन्न गावात प्रत्यक्ष बांधावर जाऊन अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यांनी झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. यावेळी शिवसेना आमदार उदयसिंग राजपूत यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व शेतकऱ्यांची उपस्थिती होती.