सिल्लोड तालुक्यात जवळपास ५१ कोटी रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ संपन्न.

महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री ना. अब्दुल सत्तार साहेब यांच्या पुढाकाराने मतदारसंघातील विकास कामांसाठी जवळपास ५१ कोटी रुपये निधी मंजूर झाला. ग्रामविकास विभागाअंतर्गत सिल्लोड तालुक्यातील विविध गांवांमध्ये या विविध विकास कामांचा शुभारंभ शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते अंधारी येथून करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्यमंत्री ना. अब्दुल सत्तार साहेब तर शिवसेना जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी यांची विशेष उपस्थिती होती.