अंभई येथील शेतकरी मेळाव्यास शेतकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद.

Divya Marathi
सिल्लोड तालुक्यातील अंभई येथे शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला. या शेतकरी मेळाव्यास तालुकाभरातून शेतकरी, सामान्य नागरिक तथा कॉंग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. या कार्यक्रमास विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, आमदार अब्दुल सत्तार, जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीराम महाजन, जेष्ठ नेते प्रभाकर पालोदकर, माजी आ. कल्याण काळे, युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.