पूर्णा नदीपात्रात उभारण्यात येणार ७ अत्याधुनिक बॅरेजेस, नदीमध्ये पायी चालून राज्यमंत्री अब्दुल सत्तार साहेब व अधिकाऱ्यांनी केली सर्वेक्षण

सिंचन क्षेत्रात वाढ करून तालुक्यातील शेतकरी समृद्ध होईल या हेतूने पूर्णा नदीच्या पात्रात अत्याधुनिक बॅरेजेस बांधण्याच्या कामाचे अंतिम सर्वेक्षण करण्यात आले. महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री ना.अब्दुल सत्तार साहेब यांच्यासह अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी सिल्लोड तालुक्यातील भवन ते केऱ्हाळा ते खोडकाईवाडी नदीपात्रात ६ की.मी. पायी चालत बॅरेजेसच्या नियोजित जागेची पाहणी केली.  सदरील बॅरेजेसचे काम पूर्ण झाल्यानंतर जवळपास 33 किलोमीटरपर्यंत पाणी अडवून यातून 54 टक्के सिंचन क्षेत्रात वाढ होऊन शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी निश्चितपणे मदत होईल.