विविध कार्यक्रमाचे छायाचित्रे

 

फर्दापूर ता. सोयगाव येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. जयंती निमित्त उत्सव समितीच्या वतीने येथे भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास राज्याचे पणन व अल्पसंख्यांक विकास मंत्री ना. अब्दुल सत्तार यांची प्रमुख उपस्थिती होती. या मिरवणुकीमध्ये विद्यार्थ्यांनी भीम गीते गाऊन नृत्य सादर केले. प्रारंभी ना.अब्दुल सत्तार यांच्याहस्ते येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.ना.अब्दुल सत्तार यांनी उपस्थितांना भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या.

 

 

सिल्लोड मतदारसंघात कोट्यावधी रुपयांच्या विकास कामांना मंजुरी दिल्याबद्दल माजी राज्यमंत्री अब्दुल सत्तार साहेब यांच्यासह हजारो समर्थकांच्या वतीने मुंबई येथील रवींद्र नाट्य मंदिरात मुख्यमंत्री ना.एकनाथरावजी शिंदे साहेब यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा संपन्न झाला. यावेळी आमदार संदीपान भुमरे, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार प्रकाश आबेटकर, अब्दुल आमेर अब्दुल सत्तार आदींसह सिल्लोड-सोयगांव मतदारसंघातील हजारो पदाधिकारी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

सिल्लोड-सोयगांव मतदारसंघात शिवस्मारक,भीमपार्क उभारण्याच्या महत्वाकांक्षी योजनेसह, विविध तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी भरीव निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री ना.अब्दुल सत्तार साहेब यांना अखिल भारतीय आखाडा परिषद, जिल्ह्यातील प्रमुख देवस्थान व शिवशारदा शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने जननायक या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शिवशारदा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव कृष्णा लहाने यांनी आयोजित केलेल्या मातृपितृ कृतज्ञता सोहळा समारोपप्रसंगी संत महंतांच्या हस्ते राज्यमंत्री अब्दुल सत्तार साहेब यांना पुरस्कार देण्यात आला.

राज्यमंत्री ना. अब्दुल सत्तार साहेब मित्र मंडळाच्या वतीने सालाबादप्रमाणे सिल्लोड येथे इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.  यावेळी महसूल तथा ग्रामविकास  राज्यमंत्री अब्दुल सतार साहेब व माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या इफ्तार पार्टीत सर्वधर्मीय बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. सामाजिक एकात्मतेचे दर्शन या इफ्तार पार्टीत दिसून आले. यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, विशेष पोलीस महानिरीक्षक मल्लिकार्जुन प्रसन्ना, पोलीस अधिक्षक मनिष कलवानिया, युवानेते अब्दुल समीर आदींसह पदाधिकारी, अधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

सिंचन क्षेत्रात वाढ करून तालुक्यातील शेतकरी समृद्ध होईल या हेतूने पूर्णा नदीच्या पात्रात अत्याधुनिक बॅरेजेस बांधण्याच्या कामाचे अंतिम सर्वेक्षण करण्यात आले. महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री ना.अब्दुल सत्तार साहेब यांच्यासह अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी सिल्लोड तालुक्यातील भवन ते केऱ्हाळा ते खोडकाईवाडी नदीपात्रात ६ की.मी. पायी चालत बॅरेजेसच्या नियोजित जागेची पाहणी केली.  सदरील बॅरेजेसचे काम पूर्ण झाल्यानंतर जवळपास 33 किलोमीटरपर्यंत पाणी अडवून यातून 54 टक्के सिंचन क्षेत्रात वाढ होऊन शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी निश्चितपणे मदत होईल.

 

सिल्लोड शहरातील मुख्य रस्त्यावर नगर परिषदेच्या वतीने साकारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वारावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य अश्वारूढ पुतळा स्थापन करण्यात आला. यावेळी फटाक्यांची आतषबाजी व जय भवानी,  जय शिवाजीच्या जयघोषाने अवघे शहर दुमदुमून गेले होते. यानिमित्ताने शहरात छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याची मिरवणूक काढण्यात आली. महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार साहेब यांच्याहस्ते महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीस सुरुवात करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने शिवप्रेमींची उपस्थिती होती.

महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री ना. अब्दुल सत्तार साहेब यांच्या पुढाकाराने सोयगांव तालुक्यातील फर्दापूर येथे अजिंठा लेणी परिसरात भव्य शिवस्मारक तसेच भिमपार्क उभारण्यात येणार आहे. शिवस्मारक व भीमपार्कचे काम गतीने पूर्ण करण्याच्या सूचना राज्यमंत्री अब्दुल सत्तार साहेब यांनी संबंधित अधिकाऱ्यांना वेळोवेळी बैठकीत दिल्या आहेत. जगप्रसिद्ध अजिंठा लेणीच्या पायथ्याशी जागतिक पातळीवर उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारकासाठी फर्दापूर येथे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने 20 एकर जागेला तत्वतः मान्यता दिली आहे. यासाठी स्थळ पाहणी करून जागा निश्चित करण्यात आली असून लवकरच या कामाचे उदघाटन होणार आहे.

 

सिल्लोड तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळावा तसेच कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा यासाठी महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री ना. अब्दुल सत्तार साहेब यांच्या पुढाकाराने सिल्लोड येथे नॅशनल सहकारी सूतगिरणी प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या सूतगिरणीची मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत विशेष बाब म्हणून 81 कोटी रुपयांच्या शासकीय अर्थसहाय्यासाठी निवड करण्यात आली असून लवकरच सूतगिरणी उभारणीचा शुभारंभ होणार आहे.

महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री ना. अब्दुल सत्तार साहेब यांचा वाढदिवस विविध सामाजिक कार्यक्रमांनी संपन्न झाला. वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम अंतर्गत सिल्लोड येथे आयोजित महारक्तदान शिबिरास व सर्वरोगनिदान शिबिरास नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. आयोजित रक्तदान शिबिरात उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्यासह 251 रक्तदात्यांनी रक्तदान केले तर 5 हजार नागरिकांनी मोफत सर्वरोगनिदान शिबिराचा लाभ घेतला. राज्यमंत्री अब्दुल सत्तार साहेब यांना वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक, राजकीय संगठन,  कार्यकर्ते, पदाधिकारी, मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.

महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री ना. अब्दुल सत्तार साहेब यांच्या वाढदिवस महारक्तदान शिबीर, मोफत कुत्रिम भिंगारोपण शस्त्रक्रिया, गरजूंना धान्य, ब्लँकेट वाटप, समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे कीर्तन अशा विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करून संपन्न झाला. कोव्हीड-19 चे नियम पाळत विविध संघटना, कार्यकर्ते, समर्थकांनी शुभेच्छा दिल्या.

आगामी काळात होणाऱ्या नगर पंचायत तसेच ग्रामपंचायतीच्या निवडणुका तसेच पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी सिल्लोड येथील सेना भवन येथे शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत शिवसेना नेते चंद्रकांत खैरे साहेब, महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री ना. अब्दुल सत्तार साहेब, शिवसेना जिल्हा प्रमुख नरेंद्र त्रिवेदी साहेब यांची प्रमुख पस्थिती होती.

करंजा जेट्टी, रेवस जेट्टी येथील बांधकामाची पाहणी तसेच अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी तसेच शेतकरी व मच्छिमारांच्या समस्या जाणून घेण्यासाठी महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री ना. अब्दुल सत्तार साहेब यांनी कोकण दौरा केला. यावेळी विविध भागातील नुकसानीची त्यांनी पाहणी केली. या दरम्यान उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत तसेच ना. अब्दुल सत्तार  साहेब यांनी श्री क्षेत्र नाणीज धाम जि. रत्नागिरी येथे जगद्गुरु रामनंदाचार्य श्री नरेंद्र महाराज यांची भेट घेतली.

मराठवाड्यात अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतपिकांची व फळपीकांची राज्याचे महसुल, ग्रामविकास, बंदरे, खार जमीन विकास, विशेष सहाय्य राज्यमंत्री ना. अब्दुल सत्तार साहेब यांनी शेतात बांधावर जाऊन प्रत्यक्ष भेट देत झालेल्या नुकसानीची पहाणी केली. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांकडून झालेल्या नुकसानीची माहिती घेऊन शासन शेतकऱ्यांप्रती सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन काम करत असुन शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही देत नुकसान झालेले एकही शेतपीक पंचनाम्यापासुन वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश त्यांनी दिले. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी व शेतकरी बांधवांची उपस्थिती होती.

धुळे जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पालकमंत्री ना.अब्दुल सत्तार साहेब यांनी पाहणी केली. त्यानुषंगाने पालकमंत्री ना. अब्दुल सत्तार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. सदर बैठकीत “माझे कुटुंब माझी जबाबदारी”, “महाराजस्व अभियान” व “सतत पावसामुळे झालेले पिक नुकसानीचा” आढावा घेण्यात आला.

महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री ना. अब्दुल सत्तार साहेब यांना कोरोना काळात मदतकार्य करीत असताना कोरोनाची लागण झाली. त्यांनी कोरोनावर यशस्वी मात केली. त्यानंतर मतदारसंघातील विविध गावांना विकासकामांसाठी जवळपास ५१ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून दिला. या निमित्त विकास कामांच्या उदघाटन साठी ना. अब्दुल सत्तार साहेब यांचे मतदारसंघातील विविध गांवात आगमन होताच नागरिकांनी त्यांचे घोड्यावर बसवून, साखरतुला करीत अनोख्या पद्धतीने स्वागत केले.

महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री नामदार अब्दुल सत्तार साहेब यांनी जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांचा आढावा घेण्यासाठी दौरा आयोजित केला होता. यावेळी कन्नड येथे आढावा बैठक नंतर कन्नड तालुक्यातील नुकसान झालेल्या पिकांची ना. अब्दुल सत्तार साहेब यांनी पाहणी केली. या पाहणी दरम्यान  खासदार इम्तियाज जलील, शिवसेना आमदार उदय सिंग राजपूत ,जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, कृषी अधिकारी श्री. मोटे आदींसह शेतकरी बांधव दिसत आहेत.

शिवसेना सदस्य नोंदणीचा शुभारंभ महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री ना. अब्दुल सत्तार साहेब तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार अंबादास दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोयगांव तालुक्यात संपन्न झाला. यावेळी शिवसैनिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री मा. ना. अब्दुल सत्तार साहेब यांच्या पुढाकाराने ग्रामविकास विभागाअंतर्गत सिल्लोड-सोयगांव विधानसभा मतदारसंघासाठी जवळपास ५१ कोटी रुपयांच्या विविध विकास कामांना मंजुरी मिळाली आहे. या कामांचे उदघाटन सोयगांव तालुक्यातील विविध गावामध्ये राज्यमंत्री ना. अब्दुल सत्तार साहेब, आमदार अंबादास दानवे व मान्यवरांच्या शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी गावकऱ्यांसह  शिवसैनिकांची उपस्थिती होती.

धुळे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अर्थात डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल येथे 50 व 60 , शिरपूर येथे 50,  मनपाच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा सामान्य रुग्णालयात 60 आणि जवाहर मेडिकल फाउंडेशन च्या वैद्यकीय महाविद्यालयात 100  असे एकूण 320 ऑक्सिजन बेडचे लोकार्पण व महिला व बालविकास योजनांसाठी महिला व बालविकास भवनचा ऑनलाइन शुभारंभ पालकमंत्री तथा महसुल , ग्रामविकास राज्यमंत्री ना. अब्दुल सत्तार साहेब यांच्या हस्ते आज संपन्न झाले .

धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूल, ग्रामविकास, राज्यमंत्री ना. अब्दुल सत्तार साहेब यांच्याहस्ते धुळे येथील जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्य शासकीय ध्वजारोहण संपन्न झाले. ध्वजारोहण नंतर पालकमंत्री अब्दुल सत्तार साहेब यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त अभिभाषण केले. त्यांनंतर कोरोना योद्धे तसेच विविध विभागात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा पालकमंत्री अब्दुल सत्तार साहेब यांच्याहस्ते प्रशस्तीपत्र देवून सन्मान करण्यात आला.

धुळे जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच मृत्युदर शून्यावर आणण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यासाठी  धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूल, ग्रामविकास, बंदरे, खार जमिनी विकास, विशेष सहाय्य राज्यमंत्री ना.अब्दुल सत्तार साहेब यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात कोरोना बाबत आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकि नंतर आयोजित पत्रकार परिषदेत उपस्थित पालकमंत्री ना.अब्दुल सत्तार साहेब, अधिकारी व पत्रकार बांधव.

महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री ना. अब्दुल सत्तार साहेब यांच्या निर्देशाने तसेच नगराध्यक्षा राजश्री निकम व उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्या मार्गदर्शनाखाली covid-19 च्या अनुषंगाने नागरिकांना मोफत उपचार मिळावा करिता शहरातील गणेश कॉलनी भागातील नागरीक प्राथमिक आरोग्य केंद्र येथे सिल्लोड नगर परिषदेच्या वतीने ताप तपासणी केंद्र  ( Fever Center ) उभारण्यात आले. मंगळवार ( दि.11 ) रोजी नगराध्यक्षा राजश्री निकम व उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील यांच्या हस्ते या केंद्राचे उद्घाटन संपन्न झाले. यावेळी  शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटविल्याने महाराष्ट्र-कर्नाटकसह देशातील शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. सिल्लोड येथे या घटनेचा महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री ना. अब्दुल सत्तार यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेच्या वतीने शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात रास्ता रोको करून कर्नाटकाचे मुख्यमंत्री येडीयुरोप्पा यांच्या प्रतिकात्मक फोटोला जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी  शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त तसेच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना पुण्यतिथीनिमित्त महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार साहेब यांच्या जनसंपर्क कार्यालय सेना भवन येथे अभिवादन करण्यात आले. यावेळी  शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमाअंतर्गत महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री ना. अब्दुल सत्तार साहेब यांच्या संकल्प व सूचनेनुसार तसेच युवानेते अब्दुल समीर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका शिवसेनेच्या वतीने कोरोना व्हायरसच्या अनुषंगाने सिल्लोड सोयगांव मतदारसंघातील कोविड योद्धे तसेच नागरिकांची रोग प्रतिकार शक्ती वाढीसाठी तहसील कार्यालया साहित इतर कार्यालयांत जोशींदा काढा वाटपाचा शुभारंभ करण्यात आला.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सिल्लोड तालुक्यातील मंगरूळ फाटा येथील सलीममीया मदरसा तसेच शिवना येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उभारण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरचे उद्घाटन करतांना महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री ना.अब्दुल सत्तार साहेब व उपस्थित पदाधिकारी.

औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोनाची सद्यस्थिती व त्यावर उपाययोजना करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुभाष देसाई व आरोग्य मंत्री ना. राजेश टोपे यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीनंतर पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी  उपस्थित महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री ना.अब्दुल सत्तार साहेब.

अजिंठा येथे राज्यमंत्री  ना. अब्दुल सत्तार साहेब यांनी उपस्थित  प्रशासकीय अधिकार्‍यांकडून अजिंठा गावासह तालुक्यातील कोरोना विषाणू बाबत आढावा घेतला.  त्यानंतर त्यांनी अजिंठा येथील कोविड सेंटर असलेल्या ग्रामीण रुग्णालयात भेट देऊन पाहणी केली .

गेल्या दोन  दिवसात अजिंठा ता. सिल्लोड येथे 13 नवीन कोरोनाचे रुग्ण वाढले. त्याअनुषंगाने अजिंठा येथील कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून राज्यमंत्री  ना. अब्दुल सत्तार साहेबांच्या निर्देशाने  शिवसेना व युवा सेनेच्या वतीने संपूर्ण अजिंठा गावात निर्जंतुकीकरण करण्यासाठी हायपोक्लोराइड व धूर फवारणी करण्यात आली. सोमवार ( दि. 6 ) रोजी अजिंठा गावातील गांधी चौक भागात या उपक्रमाचे उद्घाटन ना. अब्दुल सत्तार साहेब यांच्या हस्ते संपन्न झाले.

हरित क्रांतीचे प्रणेते दिवंगत माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री ना. अब्दुल सत्तार साहेब, जिल्हाधिकारी उदय चौधरी, जि. प. मुख्याधिकारी मंगेश गोंदवले, युवानेते अब्दुल समीर दिसत आहेत.

औरंगाबादच्या ग्रामीण भागात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व त्यावर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री ना. अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली सिल्लोड येथील शेवंताबाई मंगल कार्यालयात सिल्लोड – सोयगाव तालुक्यातील संयुक्त आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी उदय चौधरी, पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील,  जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश गोंदवले, व इतर अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

देशाचे माजी संरक्षक राज्यमंत्री तथा धुळे जिल्ह्याचे मा.खा.डॉ. सुभाष भांबरे साहेब यांना संसद पटू पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यानिमित्ताने त्यांचा पुष्पगुच्छ देवून सन्मान करतांना महसूल, ग्रामविकास राज्यमंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अब्दुल सत्तार साहेब.

धुळे येथे कोरोना विषाणू संदर्भात सध्य स्थिती व त्यावर उपाय योजना करण्यासाठी  आढावा बैठकीत उपस्थित महसूल, ग्रामविकास राज्यमंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अब्दुल सत्तार साहेब.

धुळे येथे आढावा  बैठकीच्या ततपूर्वी जिल्हाधिकारी यांच्या दालनात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकाऱ्यांची मते जाणून घेतांना महसूल, ग्रामविकास राज्यमंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अब्दुल सत्तार साहेब

पाच शाळकरी मुलींचा तलावात बुडून मृत्यू झाल्याने  राज्यमंत्री ना.अब्दुल सत्तार साहेब यांनी  तळेगाव वाडी येथे सांत्वन भेट देऊन मृत मुलींच्या कुटुंबियांना स्वपदरातून प्रत्येकी 20 हजारांची आर्थिक मदत दिली व शासनाकडून मदत मिळवून देण्याचे वचन दिले.

राज्यमंत्री अब्दुल सत्तार साहेबांच्या सूचनेनुसार मतदारसंघातील शहर व ग्रामीण भागात शिवसेनेच्या वतीने गरजू व गोरगरिबांना दुसऱ्या टप्प्यात धान्य व किराणा किट्स वाटप करतांना शिवसेना पदाधिकारी.

यूपीएल स्प्रेयर या कीटक नाशक फवारणी यंत्राचा शहरात हायपोक्लोराईड फवारणी साठी वापर करण्यात आला. यावेळी उपस्थित राज्यमंत्री अब्दुल सत्तार साहेब.

ना. अब्दुल सत्तार यांनी स्वतः अग्निशामक दलाच्या फायर गनने व नंतर ट्रॅक्टरद्वारे  शहरात हायपोक्लोराईड फवारणी  करून नगर परिषदेच्या शहर निर्जंतुकीकरण उपक्रमास सुरुवात केली.

शहर निर्जंतुकीकरणासाठी हायपोक्लोराईड व धूर फवारणी अभियानाचे उदघाटन करतांना राज्यमंत्री अब्दुल सत्तार साहेब.

सेना भवन सिल्लोड येथे शिवसेना वर्धापन दिनानिमित्त अभिवादन करतांना राज्यमंत्री अब्दुल सत्तार साहेब, युवानेते अब्दुल समीर नगराध्यक्षा राजश्री निकम, शिवसेना उपजिल्हा प्रमुख रघुनाथ चव्हाण, शिवसेना तालुका प्रमुख किशोर अग्रवाल, दिलीप मचे, डॉ. दत्ता भवर.

धन्वंतरी डॉक्टर असोसियेशनच्या वतीने न.प. कर्मचार्यांची आरोग्य तपासणी उपक्रमाच्या उदघाटन प्रसंगी युवानेते अब्दुल समीर साहेब.

युवासेनाप्रमुख ना.आदित्य ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सिल्लोड येथे वृक्षारोपण करतांना युवानेते अब्दुल समीर साहेब, मराठवाडा कॉलेजकक्ष प्रमुख ऋषिकेश प्रदीप जैस्वाल, आदी.

सिल्लोड येथे नॅशनल एज्युकेशन सोसायटी व ना.अब्दुल सत्तार मित्र मंडळाच्या वतीने सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सामुहिक विवाह सोहळ्यात २०० जोडप्यांचा विवाह पार पडला. यावेळी उपस्थित राज्यमंत्री अब्दुल सत्तार साहेब.

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करतांना राज्यमंत्री अब्दुल सत्तार साहेब.

मतदारसंघातील विविध गावांत जाऊन शेतकर्यांच्या भेटी घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतांना राज्यमंत्री अब्दुल सत्तार साहेब.

कोरोना विषाणू संदर्भात औरंगाबाद येथे राज्यमंत्री अब्दुल सत्तार साहेबांनी आढावा बैठक घेतली

 

कोरोना विषाणू संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधतांना राज्यमंत्री अब्दुल सत्तार साहेब व मंत्री भुमरे साहेब

 

कोरोना संकटाच्या काळात गरिबांना अन्न, मास्क व साबणांचे वाटप करतांना राज्यमंत्री अब्दुल सत्तार साहेब

 

 

सिल्लोड येथे शिवभोजन योजनेचा शुभारंभ राज्यमंत्री अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते करण्यात आला.

 

 

पालकमंत्री नामदार अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते धुळे येथे शिवभोजन योजनेचा शुभारंभ.

 

 

धुळे येथे परेड काढण्यात आले, पालकमंत्री नामदार अब्दुल सत्तार साहेब व इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.

 

 

पालकमंत्री नामदार अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते धुळे येथे ध्वजारोहण करण्यात आले.

 

जिल्हाधिकारी कार्यालय धुळे येथे जिल्हा नियोजन समितीची बैठक घेण्यात आली.

 

 

अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात राज्यमंत्री अब्दुल सत्तार साहेब यांनी आढावा बैठक घेतली.

  

राज्यमंत्री नामदार अब्दुल सत्तार साहेबांच्या जन्मदिनानिमित्त युवा नेते नेत्र शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले यावेळी राज्यमंत्री नामदार अब्दुल सत्तार साहेब व इतर.

राज्यमंत्री नामदार अब्दुल सत्तार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त सिल्लोड येथे सर्वरोग निदान शिबिराचा (2020) शुभारंभ करण्यात करण्यात आला.
 

 
युवा नेते अब्दुल समीर अब्दुल सत्तार यांच्या हस्ते रुग्णांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले.

अब्दुल सत्तार साहेबांनी सिल्लोड-सोयगाव विधानसभा निवडणूकीत मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला त्यानिमित्त सिल्लोड येथे रॅली काढण्यात आली.
 


अजिंठा येथे येथील कॉर्नर बैठकीस प्रचंड प्रतिसाद

 

सिल्लोड शहरात प्रचंड जाहीर सभा घेण्यात आली.

 

 

सोयगाव येथे एकनाथ शिंदे साहेब यांची सभा घेण्यात आली यावेळी प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता.

 

 

शिवसेना-भाजपा-रासपा-रिपाई (अ) महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून अब्दुल सत्तार साहेबांच्या प्रचारार्थ यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध गावांत सभा घेण्यात आल्या

 

 

सिल्लोड येथे  शिवसेना-भाजपा-रासपा-रिपाई (अ)  महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून अब्दुल सत्तार साहेबांच्या प्रचारार्थ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांची जाहीर सभा घेण्यात आली.

 

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी शिवसेना-भाजपा-रासपा-रिपाई (अ) महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून अब्दुल सत्तार यांनी हजारो शिवसैनिकांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज भरला.

 

पाणी टंचाईवर उपाय शोधण्यासाठी व जनावरांसाठी चारा छावण्या सुरु करण्यासाठी सिल्लोड तालुक्यातील गोळेगाव  येथे दिनांक १० मे २०१९ रोजी आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी दिलेल्या भेटींचे छायाचित्रे.

 

 

पाणी टंचाईवर उपाय शोधण्यासाठी व जनावरांसाठी चारा छावण्या सुरु करण्यासाठी सिल्लोड तालुक्यातील धोत्रा   येथे दिनांक १० मे २०१९ रोजी आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी दिलेल्या भेटींचे छायाचित्रे.

 

 

पाणी टंचाईवर उपाय शोधण्यासाठी व जनावरांसाठी चारा छावण्या सुरु करण्यासाठी सिल्लोड तालुक्यातील भवन  येथे दिनांक १० मे २०१९ रोजी आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी दिलेल्या भेटींचे छायाचित्रे.

 

पाणी टंचाईवर उपाय शोधण्यासाठी व जनावरांसाठी चारा छावण्या सुरु करण्यासाठी सिल्लोड तालुक्यातील शिवना  येथे दिनांक १० मे २०१९ रोजी आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी दिलेल्या भेटींचे छायाचित्रे.

 

पाणी टंचाईवर उपाय शोधण्यासाठी व जनावरांसाठी चारा छावण्या सुरु करण्यासाठी सिल्लोड तालुक्यातील पिंपळदरी  येथे दिनांक १० मे २०१९ रोजी आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी दिलेल्या भेटींचे छायाचित्रे. 

 

पाणी टंचाईवर उपाय शोधण्यासाठी व जनावरांसाठी चारा छावण्या सुरु करण्यासाठी सिल्लोड तालुक्यातील लिहाखेडी  येथे दिनांक १० मे २०१९ रोजी आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी दिलेल्या भेटींचे छायाचित्रे.

 

 

पाणी टंचाईवर उपाय शोधण्यासाठी व जनावरांसाठी चारा छावण्या सुरु करण्यासाठी सिल्लोड तालुक्यातील खुपटा येथे दिनांक १० मे २०१९ रोजी आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी दिलेल्या भेटींचे छायाचित्रे.

 

 

पाणी टंचाईवर उपाय शोधण्यासाठी व जनावरांसाठी चारा छावण्या सुरु करण्यासाठी सिल्लोड तालुक्यातील हळदा  येथे दिनांक १० मे २०१९ रोजी आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी दिलेल्या भेटींचे छायाचित्रे.

 

 

पाणी टंचाईवर उपाय शोधण्यासाठी व जनावरांसाठी चारा छावण्या सुरु करण्यासाठी सिल्लोड तालुक्यातील देऊळगाव बाजार  येथे दिनांक ९ मे २०१९ रोजी आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी दिलेल्या भेटींचे छायाचित्रे.

 

 

पाणी टंचाईवर उपाय शोधण्यासाठी व जनावरांसाठी चारा छावण्या सुरु करण्यासाठी सिल्लोड तालुक्यातील बोरगाव बाजार  येथे दिनांक ९ मे २०१९ रोजी आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी दिलेल्या भेटींचे छायाचित्रे.

 

 

पाणी टंचाईवर उपाय शोधण्यासाठी व जनावरांसाठी चारा छावण्या सुरु करण्यासाठी सिल्लोड तालुक्यातील आमठाणा  येथे दिनांक ९ मे २०१९ रोजी आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी दिलेल्या भेटींचे छायाचित्रे.

 

 

पाणी टंचाईवर उपाय शोधण्यासाठी व जनावरांसाठी चारा छावण्या सुरु करण्यासाठी सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा येथे दिनांक ९ मे २०१९ रोजी आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी दिलेल्या भेटींचे छायाचित्रे

 

 

पाणी टंचाईवर उपाय शोधण्यासाठी व जनावरांसाठी चारा छावण्या सुरु करण्यासाठी सिल्लोड तालुक्यातील उंडणगाव येथे दिनांक ८ मे २०१९ रोजी आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी दिलेल्या भेटींचे छायाचित्रे

 

 

आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी औरंगाबाद लोकसभेची जागा अपक्ष लढावी किंवा नाही हे मत जाणून घेण्यासाठी औरंगाबाद येथील आमखास मैदान येथे समर्थकांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्याची काही छायाचित्रे

   

  

  

 

सिल्लोड शहरातील नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांचे जागेवरच निवारण करण्यासाठी  दिनांक १ डिसेंबर २०१८ पासून सुरु असलेल्या ‘आमदार आपल्या दारी’ अभियानांतर्गत नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी भेटी देण्यात आल्या त्यासंदर्भातील हि काही छायाचित्रे.

एल्गार यात्रेची सुरुवात औरंगाबाद येथील क्रांती चौक येथून करण्यात आली या प्रसंगाची काही छायाचित्रे.

सिल्लोड येथे नॅशनल एज्युकेशन सोसायटीच्या वतीने सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सामुहिक विवाह सोहळ्यामध्ये ५५५ जोडप्यांचा विवाह पार पाडण्यात आला. या विवाह सोहळ्यास आमदार अब्दुल सत्तार साहेबांसोबत अनेक दिग्गजांची उपस्थिती होती, त्यासंदर्भातील ही काही छायाचित्रे.

औरंगाबाद येथे आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसच्या वतीने आयोजित मोर्चातील काही छायाचित्रे.

1234

सिल्लोड नगरपरिषद अध्यक्षपदी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. याप्रसंगीचे हे काही छायाचित्र.

IMG-20160905-WA0071 IMG-20160905-WA0072

IMG-20160905-WA0073

औरंगाबाद येथील गांधी भवन कार्यालयामध्ये झालेल्या बैठकीचे छायाचित्रे.

IMG-20160807-WA0101 IMG-20160807-WA0106

IMG-20160807-WA0103IMG-20160807-WA0104
सिल्लोड तालुक्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर व निराधारांच्या विवीध मागण्यासाठी युवक कॉंग्रेसच्या वतीने सिल्लोड येथील तहसील कार्यालयावर प्रचंड मोर्चा काढण्यात आला. यावेळी तहसीलदारांना निवेदन देतांना युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार, राष्ट्रीय सचिव ऋत्विज जोशी, जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीराम महाजन व इतर.

Youth Morcha-Sillod

युवक कॉंग्रेसच्या वतीने सिल्लोड येथील तहसील कार्यालयावर प्रचंड मोर्चा काढण्यात आला. यावेळी उपस्थित जनसमुदायाला संबोधित करतांना युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार मंचावर उपस्थित आ. अब्दुल सत्तार साहेब, युवक कॉंग्रेसचे राष्ट्रीय सचिव ऋत्विज जोशी, जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीराम महाजन व इतर.

Youth Morcha-Sillod (4)Youth Morcha-Sillod (5)Youth Morcha-Sillod (3)Youth Morcha-Sillod (6)

मुंबई येथे माजी मुख्यमंत्री व खा. अशोकरावजी चव्हाण साहेब यांनी महाराष्ट्र कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला त्यावेळी आ. अब्दुल सत्तार साहेब व कॉंग्रेस पक्षाचे इतर मान्यवर उपस्थित होते.

Abdul Sattar

कॉंग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी माजी मुख्यमंत्री व खा. श्री अशोकरावजी चव्हाण साहेब यांची नियुक्ती झाल्याबद्दल मुंबई येथे त्यांचा सत्कार करतांना आ. अब्दुल सत्तार साहेब व इतर मान्यवर.

DSC_3472DSC_3474DSC_3475DSC_3473

अजिंठा येथील आगीत मृत्युमुखी पडलेल्या मुलीच्या कुटुंबियांना वैयक्तिक पन्नास हजार रुपयाची मदत देतांना आ. अब्दुल सत्तार साहेब.

DSC_0065DSC_0064DSC_0055DSC_0060

आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते वसई ता. सिल्लोड येथे पाणी पुरवठा योजनेच्या टप्पा २ अंतर्गत कामाचे भूमिपूजन करण्यात आले.

Inauguration of road

भव्य सर्वरोग निदान शिबीर तसेच मोफत शस्त्रक्रिया व कृत्रिम भिंगारोपण शिबिराचे उद्घाटन करतांना आमदार अब्दुल सत्तार साहेब व इतर मान्यवर.

DSC_0072DSC_0060DSC_0061DSC_0076

आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सिल्लोड येथे राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण समिती औरंगाबाद व नगरपरिषद सिल्लोड यांच्या संयुक्त विद्यमाने  भव्य सर्वरोग निदान शिबीर तसेच मोफत शस्त्रक्रिया व कृत्रिम भिंगारोपण शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये  सहा हजार रुग्णांची तपासणी करण्यात आली असून ११५ रुग्णांनाचष्मे वाटप करण्यात आले आहेत.

DSC_0066DSC_0069DSC_0553DSC_0230

सिल्लोड तालुक्यातील शिवना गावातील आत्महत्या करणाऱ्या रमेश भागवत या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना आ. अब्दुल सत्तार यांनी भेट देऊन त्यांचे सांत्वन केले व सदरील कुटुंबियांना वैयक्तिक आर्थिक मदत म्हणून पन्नास हजार रुपयाची मदत केली. यावेळी उपविभागीय अधिकारी सी. एस. कोकणी, तहसीलदार राहुल गायकवाड व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

DSC_0386DSC_0389

जालना लोकसभा युवक कांग्रेसचे अध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सिल्लोड शहरातील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय येथे रुग्णांना फळ व ब्लंकेट वाटप करण्यात आले.

DSC_0214DSC_0217

अपंग व मुकबधीर शाळेतील विध्यार्थ्यांना जालना लोकसभा युवक कांग्रेसचे अध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले.

DSC_0314DSC_0310

जालना लोकसभा युवक कांग्रेसचे अध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद रजाळवाडी शाळेतील विध्यार्थ्यांना शालेय साहित्य व स्वेटरचे वाटप करण्यात आले.

DSC_0285DSC_0287
विठ्ठल लोखंडे यांनी आत्महत्या केल्यानंतर लोखंडे कुटुंबियांचा आधार गेला त्यामुळे या कुटूंबावर दुखा:चा डोंगर कोळला आहे अशा वेळी या कुटुंबीयास कॉंग्रेस पक्षातर्फे ५१ हजार रुपयाची मदत देण्यात आली यावेळी माणिकराव ठाकरे साहेब, अब्दुल सत्तार साहेब, नितीन राऊत साहेब ,जि.प.अध्यक्ष श्रीराम महाजन ,नितीनजी पाटील व इतर सहकारी व नागरिक.

DSC_0398

विठ्ठल लोखंडे यांच्या आत्महत्येमुळे त्यांच्या कुटुंबीयावर दुखा:चा डोंगर कोसळला आहे. अशावेळी या लोखंडे परिवाराला गरज आहे ती आधाराची आणि या दुखा:तून सावरण्यासाठी कणखर मनोधैर्याची. अशावेळी लोखंडे कुटुंबियांचे सांत्वन करतांना आ. अब्दुल सत्तार साहेब, माणिकरावजी ठाकरे, नितीन राउत साहेब, कॉंग्रेसचे इतर पदाधिकारी व नागरिक.

DSC_0395

औरंगाबाद येथील विभागीय मेळावा संपन्न करून अब्दुल सत्तार साहेबांनी प्रदेशाध्यक्ष मा. माणिकरावजी ठाकरे साहेबांसोबत मतदारसंघातील अंधारी गटात जाऊन दुष्काळाची पाहणी केली व ठाकरे साहेबांनी या दुष्काळग्रस्त शेतकऱ्याला मदत मिळवून देण्याचे वचन दिले ,या वचनास सर्व काँग्रेसजन कटिबद्ध आहेत.

DSC_0386

नगरपरिषद सिल्लोड व उपजिल्हा रुग्णालय यांच्या सयुंक्त विद्यमाने डेंग्यू, मलेरिया, हिवताप या रोगांसाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून व नागरिकांच्या चांगल्या आरोग्यासाठी ‘साथरोग तपासणी मोहीम’ सुरु करण्यात आली. या वेळी मोहिमेत नागरिकांशी चर्चा करतांना आमदार अब्दुल सत्तार साहेब सोबत इतर पदाधिकारी व मान्यवर दिसत आहेत.

उपजिल्हा रुग्णालयामध्ये रुग्णांशी चर्चा करतांना अब्दुल सत्तार साहेब.

‘साथरोग तपासणी मोहीम’ अंतर्गत स्वच्छतेविषयी नागरिकांसोबत चर्चा करतांना अब्दुल सत्तार साहेब.

‘साथरोग तपासणी मोहीम’ अंतर्गत उपजिल्हा रुग्णालयाची पाहणी करतांना अब्दुल सत्तार साहेब.

सिल्लोड येथे प्रचंड मोर्चामध्ये असंख्य कार्यकर्ते व शेतकरी बांधवाना उद्देशून बोलतांना अब्दुल सत्तार साहेब.

सिल्लोड येथे आयोजित केलेल्या प्रचंड मोर्चामध्ये शेतकरी व कार्यकर्त्यांसोबत आमदार अब्दुल सत्तार साहेब.

 

 

सिल्लोड व सोयगाव तालुका दुष्काळग्रस्त जहीर झाला पाहिजे या मागणीसाठी शेतकऱ्यांशी चर्चा करतांना अब्दुल सत्तार साहेब व मंचावर उपस्थित असलेले मान्यवर.