महसूल, ग्रामविकास, बंदरे, खार जमिनी विकास व विशेष सहाय्य राज्यमंत्री ना. अब्दुल सत्तार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्ताने वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेला विशेषांक. (01.01.2022)

महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री ना. अब्दुल सत्तार साहेब यांचा वाढदिवस विविध सामाजिक कार्यक्रमांनी संपन्न झाला. वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम अंतर्गत सिल्लोड येथे आयोजित महारक्तदान शिबिरास व सर्वरोगनिदान शिबिरास नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. आयोजित रक्तदान शिबिरात उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्यासह 251 रक्तदात्यांनी रक्तदान केले तर 5 हजार नागरिकांनी मोफत सर्वरोगनिदान शिबिराचा लाभ घेतला. राज्यमंत्री अब्दुल सत्तार साहेब यांना वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक, राजकीय संगठन,  कार्यकर्ते, पदाधिकारी, मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.