सिद्धेश्वर सहकारी बँकेच्या निवडणुकीत पालोदकर गटाच्या हाती सत्ता द्या- आ. अब्दुल सत्तार.

Mata
सिद्धेश्वर सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ सिल्लोड येथील रामरहीम व्यापार संकुलात प्रचाराची सुरुवात करण्यात आली. यावेळी बोलतांना आ. अब्दुल सत्तार साहेब म्हणाले की सिद्धेश्वर सहकारी बँकेची स्थापना करून कै. दादासाहेब पालोदकरांनी मराठवाड्यात सहकाराची मुहूर्तमेढ रोवली. त्यामुळे त्यांच्या कार्याला महत्व देऊन सिद्धेश्वर सहकारी बँकेच्या निवडणुकीत बँकेची सत्ता सहकार महर्षी दादासाहेब पालोदकर पैनलच्या हाती द्यावी असे आवाहन आ. अब्दुल सत्तार साहेबांनी यावेळी केले.