Archive for नोव्हेंबर, 2014

तीन दिवसाआड पाणीपुरवठा करा- अब्दुल सत्तार.

अजिंठा गावातील पाणीप्रश्नाला ग्रामस्थ वैतागले असून, यावर तोडगा काढण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात आमदार अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थितीत विशेष ग्रामसभा झाली. यावेळी अब्दुल सत्तार साहेब म्हणाले कि नियोजनाअभावी अजिंठा येथे पंधरा दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पाण्याचे योग्य नियोजन करून तीन दिवसाआड पाणी पुरवावे अशा सूचनाही त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

अधिक वाचा

लवकरच पाणीप्रश्न निकाली -अब्दुल सत्तार.

अजिंठा येथे आयोजित ग्रामसभेमध्ये आमदार अब्दुल सत्तार म्हणाले की, अजिंठा अंधारी धरणात मुबलक पाणी असतांना केवळ प्रशासनाच्या हलगर्जी कारभारामुळे नागरिकांना मुबलक पाणी मिळत नाही. दरम्यान अजिंठा येथे २२ कि.मी. अंतर्गत नवीन पाईप लाईनच्या कामाचा शुभारंभ करण्यात आलेला आहे.

अधिक वाचा

नागरिकांनी स्वच्छता मोहिमेत सहभागी व्हावे- अब्दुल सत्तार.

नगरपरिषद सिल्लोड व उपजिल्हा रुग्णालय यांच्या सयुंक्त विद्यमाने डेंग्यू, मलेरिया, हिवताप या रोगांच्या प्रतिबंधात्मक उपाय म्हणून व नागरिकांच्या चांगल्या आरोग्यासाठी ‘साथरोग तपासणी मोहीम’ सुरु करण्यात आली आहे. शहराच्या स्वच्छता मोहिमेत नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवून या मोहिमेस सहकार्य करण्याचे आवाहन आमदार अब्दुल सत्तार यांनी यावेळी जनतेस केले आहे.

अधिक वाचा

आरोग्य यंत्रणेने खबरदारी घ्यावी- अब्दुल सत्तार.

थंडी, ताप, डेंग्यू, मलेरिया व इतर आजारांमुळे शहरातील नागरिकांप्रमाणेच तालुक्यातील नागरिक सुद्धा त्रस्त आहेत.यामुळे दवाखान्यात मोठी गर्दी होत आहे.नित्याच्या या परिस्थितीबाबत आरोग्य विभागाने योग्य काळजी घ्यावी यासाठी आमदार अब्दुल सत्तार यांनी उपजिल्हा रुग्णालयात जाऊन पाहणी केली व संबधितांना यासंदर्भात सूचना दिल्या आहेत.

अधिक वाचा

उपजिल्हा रुग्णालयाला आ.अब्दुल सत्तार यांनी दिली भेट.

अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी रुग्णालयातील रुग्णांशी संवाद साधून रुग्णालयातील स्वच्छतेचा आढावा घेतला. नागरिकांच्या सुविधेसाठी आजपासून ‘साथरोग निर्मलन मोहिमे’चा आरंभ होत आहे.

अधिक वाचा

शासकीय रुग्णालयाची आमदार अब्दुल सत्तार यांनी केली पाहणी.

नागरिकांमध्ये डेंग्यू, मलेरिया यासारख्या आजाराविषयी भिती निर्माण झालेली आहे. या अनुषंगाने आमदार अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयाला भेट दिली. येथील उपाययोजना व स्वच्छतेची पाहणी करून त्यांनी रुग्णांशी सवांद सुद्धा साधला. यासोबतच खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा परिषद व उपजिल्हा रुग्णालय यांच्या सयुंक्त विद्यमाने शहरात साथरोग निर्मुलन मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.

अधिक वाचा

भाजपा सरकारचे नियंत्रण पवारांच्या हाती – अब्दुल सत्तार.

औरंगाबाद येथे अब्दुल सत्तार साहेबांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी अब्दुल सत्तार साहेब म्हणाले की सध्याचे भाजपा सरकार हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या पाठिंब्याच्या आधारावर असल्यामुळे हे सरकार फार काळ तग धरू शकणार नाही.

अधिक वाचा

पं. नेहरुचे जीवनकार्य सदैव प्रेरणादायी- अब्दुल सत्तार.

स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आयुष्यभर दीनदलित व सर्वसामान्यांना सोबत घेऊन देशाचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांचे जीवन कार्य हे समाजासाठी कायम प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री व विद्यमान आमदार अब्दुल सत्तार यांनी केले आहे.

अधिक वाचा

भाजपा थोड्याच दिवसाचे सरकार- अब्दुल सत्तार.

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या १२५ व्या जयंतीचा कार्यक्रम, कॉंग्रेस पक्ष सदस्य नोंदणीचा कार्यक्रम व त्याच प्रमाणे अब्दुल सत्तार साहेब यांच्या सत्काराचा कार्यक्रम औरंगाबाद येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमामध्ये बोलतांना अब्दुल सत्तार साहेब म्हणाले कि, भाजपा सरकार हे राष्ट्रवादीच्या आधारावर अवलंबून असून ते कधी कोसळेल याचा नेम नाही त्यामुळे कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी …

अधिक वाचा

औरंगाबाद भूमी अभिलेख विभागामध्ये विविध पदासाठी पदभरती.

औरंगाबाद भूमी अभिलेख विभागामध्ये विविध पदासाठी पदभरती करण्यात येत आहे. त्यासाठी इच्छुक पात्र उमेद्वारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अधिक माहितीसाठी कृपया उमेद्वारानी www.oasis.mkcl.org/landrecords2014 या संकेतस्थळाला शेवट दिनांक १ डिसेंबर २०१४ पूर्वी भेट देवून आपले अर्ज सादर करावेत. अन्य शासकीय नोकरी संदर्भातील अधिक माहितीसाठी कृपया www.abdulsattar.in या संकेत संकेतस्थळाला वेळोवेळी भेट दयावी.

अधिक वाचा