Archive for फेब्रुवारी, 2015

घाटनांद्रा सोसायटीच्या संचालकांचा आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते सत्कार.

सिल्लोड येथील गांधी भवन मध्ये आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते घाटनांद्रा येथील विविध कार्यकारी सहकारी संस्थेवर विजय मिळविलेल्या कॉंग्रेस पक्षाच्या एकता विकास पनलच्या विजयी उमेद्वारांचा सत्कार करण्यात आला.

अधिक वाचा

सिल्लोड कृउबा समिती कॉंग्रेसच्या ताब्यात.

सिल्लोड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीवर आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेस पक्षाने वर्चस्व राखले आहे. सभापती पदी सदाशिव तायडे तर उपसभापती पदी ठगन भागवत यांची निवड झाली आहे. मिरवणूक काढून या विजयाचा आनंद साजरा करण्यात आला त्याच प्रमाणे फुलांचा हार घालून विजयी उमेद्वारांचा सत्कार करण्यात आला.

अधिक वाचा

सिल्लोड कृउबा समितीवर आ. अब्दुल सत्तार साहेबांचे वर्चस्व.

अत्यंत प्रतिष्ठेची बनलेली सिल्लोड कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती व उपसभापतीच्या पदाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीमध्ये आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या कार्यकुशलतेच्या बळावर कृषी उत्पन्न बाजार समिती कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ताब्यात आली आहे. सभापती पदी सदाशिव तायडे तर उपसभापती पदी ठगन भागवत यांची निवड झाली आहे.

अधिक वाचा

सिल्लोड सोसायटीची निवडणूक बिनविरोध.

सिल्लोड विविध कार्यकारी सेवा सोसायटी संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध संपन्न झाली असून संस्थेवर आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसचे वर्चस्व कायम राहिले आहे. सिल्लोड येथील नगर परिषदेच्या सभागृहात बिनविरोध निवडून आलेल्या सदस्यांचा आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

अधिक वाचा

कर्मचारी निवड आयोगामार्फत विविध पदांसाठी ऑनलाइन पद्धतीने पदभरती.

कर्मचारी निवड आयोगामार्फत विविध पदांसाठी ऑनलाइन पद्धतीने पदभरती करण्यात येत आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेद्वारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. अधिक माहितीसाठी कृपया उमेद्वारानी http://ssconline.nic.in या संकेतस्थळाला शेवट दिनांक २३ फेब्रुवारी २०१५ पूर्वी भेट देवून आपले अर्ज सादर करावेत. अन्य शासकीय नोकरी संदर्भातील अधिक माहितीसाठी कृपया www.abdulsattar.in या संकेत संकेतस्थळाला वेळोवेळी भेट दयावी.

अधिक वाचा

पाण्याचा वापर काटकसरीने करावा- आ. अब्दुल सत्तार

सिल्लोड विधानसभा मतदार संघामध्ये अत्यंत कमी पाऊस पडल्याने यावर्षी पिण्याच्या पाण्याची अत्यंत तीव्र टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. म्हणून या जल संकटावर मात करण्यासाठी नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन आ. अब्दुल सत्तार यांनी जनतेला केले आहे. ते सिल्लोड येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीमध्ये बोलत होते.

अधिक वाचा

आश्रम शाळेच्या बांधकामाचे आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते उद्घाटन.

आ. अब्दुल सत्तार यांच्या हस्ते १९ फेब्रुवारी रोजी सिल्लोड तालुक्यातील हट्टी येथे शासकीय आदिवासी आश्रमशाळा बांधकामाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी बोलतांना आ. अब्दुल सत्तार साहेब म्हणाले की, आघाडी सरकारने आश्रम शाळांच्या इमारतीसाठी चार कोटी रुपयांची योजना मंजूर केली होती. या आश्रम शाळेमध्ये शिक्षण घेणाऱ्या आदिवासी मुलांना शैक्षणिक सुविधांसाठी निधी कमी पडू देणार नाही असे आश्वासन …

अधिक वाचा

आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते नागरी प्राथमिक रुग्णालयाचे लोकार्पण.

सिल्लोड येथे आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत मंजूर करण्यात आलेल्या नागरी प्राथमिक रुग्णालयाचा लोकार्पण सोहळा दि. १८ फेब्रुवारी रोजी पार पडला. या याप्रसंगी अब्दुल सत्तार साहेब म्हणाले की, गरजू, सर्वसामान्य रुग्णांना तातडीने आरोग्य सेवा मिळावी या हेतूने हे रुग्णालय सुरू करण्यात आले आहे.आरोग्याची समस्या निर्माण होऊ नये याकरीता नागरिकांनी व्यसनापासून दूर राहावे …

अधिक वाचा

दिवंगत मा. आर. आर. पाटील यांना श्रद्धांजली.

आ. अब्दुल सत्तार साहेब व कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून सिल्लोड येथील कॉंग्रेस पक्षाच्या कार्यालयामध्ये राष्ट्रवादी पक्षाचे दिवंगत नेते आर.आर. पाटील यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

अधिक वाचा