सिल्लोड येथील शाहू महाराज मंगल कार्यालयात कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकी संदर्भात बैठक घेण्यात आली. या बैठकीस आ. अब्दुल सत्तार साहेब, युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा नगराध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार व इतर पदाधिकारी तथा कार्यकर्ते उपस्थित होते.
सिल्लोड बाजार समिती निवडणुकीसंदर्भात सिल्लोड येथे बैठक घेण्यात आली, सर्व उमेदवारांनी आपणच स्वतः उमेदवार असल्याचे समजून कामाला लागावे असे आवाहन आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी यावेळी केले.
सिल्लोड येथे भाऊबीजेनिमित्त महिला कॉंग्रेसच्या तालुकाध्यक्षा दुर्गाबाई पवार व उपनगराध्यक्षा शकुंतलाबाई बन्सोड यांना भेट वस्तू देतांना आमदार अब्दुल सत्तार साहेब.
आमदार अब्दुल सत्तार साहेब व युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा सिल्लोड न.प. चे नगराध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार यांनी आदिवासियांसोबत दिवाळी साजरी केली.
सिल्लोड येथे आमदार अब्दुल सत्तार साहेब व नगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्या वतीने शहरातील आदिवासी व गरिबांना दिवाळी निमित्त खाद्यान्न, मिठाई व कपडे वितरीत करण्यात आले.
कन्नड येथिल महावितरण कार्यालयामध्ये आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी बैठक घेतली व शेतकऱ्यांच्या शेतीसाठी आवश्यक असलेल्या वीजपुरवठा प्रश्नासंबधीचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याच्या संबधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
सिल्लोड येथिल गांधी भवन येथे दीपावली निमित्ताने आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या वतीने महिलांना साडी-चोळी व मिठाईचे वाटप करण्यात आले. यावेळी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा नगराध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
संतोष जाधव यांच्यासह अनेकजनांनी मुंबई येथील गांधी भवन येथे कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी प्रदेशाध्यक्ष अशोकरावजी चव्हाण साहेब, आमदार अब्दुल सत्तार साहेब आदी उपस्थित होते.
मुंबई येथील गांधी भवन येथे विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी प्रदेशाध्यक्ष अशोकरावजी चव्हाण साहेब, आमदार अब्दुल सत्तार साहेब आदी उपस्थित होते.