Archive for नोव्हेंबर, 2020

सेनाभवन सिल्लोड येथे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न

आगामी काळात होणाऱ्या नगरपंचायत व ग्रामपंचायतीच्या निवडणुका तसेच सिल्लोड-सोयगांव विधानसभा मतदारसंघातील शिवसेना पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी सिल्लोड शहरातील सेना भवन येथे शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक सम्पन्न झाली. या बैठकीस शिवसेना नेते मा. खासदार चंद्रकांत खैरे साहेब, महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री ना.अब्दुल सत्तार साहेब व शिवसेना जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती.

अधिक वाचा

महसूल,ग्रामविकास बंदरे, खार जमिनी विकास व विशेष सहाय्य राज्यमंत्री ना. अब्दुल सत्तार साहेब यांचा कोकण दौरा.

कोकणातील ग्रामीण भागातील विविध प्रश्न, खारभूमीचे प्रश्न, बंदरे, जेट्टी, मच्छीमारांचे प्रश्न, अतिवृष्टी आणि वादळामुळे झालेले नुकसान, माझे कुटुंब माझी जबाबदारी अशा विविध विषयांचा आढावा व पाहणी करण्यासाठी महसूल, ग्रामविकास,बंदरे, खारजमिनी विकास, विशेष सहाय्य विभागाचे राज्यमंत्री ना. अब्दुल सत्तार साहेब यांनी कोकण विभागाचा दौरा केला. कोकणातील अनेक प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांनी शासनदरबारी पुढाकार घेतला. तसेच ठाकरे …

अधिक वाचा

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राज्यमंत्री ना. अब्दुल सत्तार साहेब यांचा मराठवाडा दौरा.

मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले. अनेकांच्या घरांची पडझड झाली तर बऱ्याच शेतकऱ्यांचे पशुधन पाण्यात वाहून गेले. या संपूर्ण नुकसानीचा आढावा घेण्यासाठी राज्यमंत्री ना. अब्दुल सत्तार साहेबांनी मराठवाड्यातील औरंगाबाद सह जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यात थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी नुकसानीची पाहणी करीत शेतकऱ्यांशी संवाद साधला. काळजी करू नका ठाकरे …

अधिक वाचा

औरंगाबाद जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची राज्यमंत्री ना. अब्दुल सत्तार साहेबांनी केली पाहणी.

महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री नामदार अब्दुल सत्तार साहेब यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांचा आढावा घेण्यासाठी औरंगाबाद जिल्ह्याचा दौरा आयोजित केला होता. यावेळी विविध तालुक्यांतील नुकसान झालेल्या पिकांची ना. अब्दुल सत्तार साहेब यांनी पाहणी करीत शेतकऱ्यांशी संवाद साधला. या पाहणी दरम्यान खासदार इम्तियाज जलील, शिवसेना आमदार उदय सिंग राजपूत, आमदार रमेश बोरनारे, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, आदींसह शेतकरी …

अधिक वाचा

राज्यमंत्री ना. अब्दुल सत्तार साहेबांनी सोयगांव तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची केली पाहणी.

महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री ना. अब्दुल सत्तार साहेबांनी सोयगांव तालुक्यातील विभिन्न गावात प्रत्यक्ष बांधावर जाऊन अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यांनी झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. यावेळी शिवसेना आमदार उदयसिंग राजपूत यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व शेतकऱ्यांची उपस्थिती होती.

अधिक वाचा

सोयगांव तालुक्यात विविध विकास कामांचा शुभारंभ राज्यमंत्री ना. अब्दुल सत्तार साहेबांच्या शुभहस्ते संपन्न.

महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री ना. अब्दुल सत्तार साहेब यांच्या पुढाकाराने सोयगांव तालुक्यासाठी मंजूर झालेल्या जवळपास १० कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचा तसेच “ माझे कुटुंब माझी जबाबदारी”  अभियानाचा शुभारंभ राज्यमंत्री ना. अब्दुल सत्तार साहेब व आमदार अंबादास दानवे यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी गावातील नागरिकांसह शिवसैनिकांची उपस्थिती होती.

अधिक वाचा

सिल्लोड तालुक्यात जवळपास ५१ कोटी रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ संपन्न.

महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री ना. अब्दुल सत्तार साहेब यांच्या पुढाकाराने मतदारसंघातील विकास कामांसाठी जवळपास ५१ कोटी रुपये निधी मंजूर झाला. ग्रामविकास विभागाअंतर्गत सिल्लोड तालुक्यातील विविध गांवांमध्ये या विविध विकास कामांचा शुभारंभ शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते अंधारी येथून करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्यमंत्री ना. अब्दुल सत्तार साहेब तर शिवसेना जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी यांची …

अधिक वाचा