सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेतलेल्या अब्दुल सत्तार यांचा शालेय शिक्षणापासून मंत्री पदापर्यंतचा प्रवास

 

Abdul Sattar

अब्दुल सत्तार अब्दुल नबी त्यांचे पूर्ण नांव असून त्यांचा जन्म ०१ जानेवारी १९६५ मध्ये एकाकाळच्या छोटेसे गांव असलेले व आजचे सिल्लोड शहरामध्ये एका सर्वसामान्य कुटुंबात झालेला असून त्यांचे शिक्षण बी.ए. पर्यंत झालेले असून त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट हलाकीची होती. मोलमजुरी करून त्यांच्या वडिलाने त्यांच्या व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचा सांभाळ केला. शालेय जीवनात अब्दुल सत्तार यांनीही मोलमजुरी हमाली करून आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. याच दरम्यान छोटासा सायकल दुकान व्यवसाय त्यांनी व त्यांचे वडील बंधू अब्दुल गफ्फार यांनी संयुक्तपणे सुरु केला. या काळापासून त्यांच्या आर्थिक परीस्थित सुधारणा होत गेली. अब्दुल सत्तार हे चार भाऊ असून ते आपल्या चार भावंडांमध्ये तिसऱ्या क्रमांकाचे आहेत. नावांतच सत्ता – र असल्याचे कि काय ? मतदार वय झाल्यापासूनच सत्ता त्यांच्याजवळ येणे सुरु झाले.
अब्दुल सत्तार यांचे शालेय प्राथमिक शिक्षण जि.प. प्राथमिक शाळा सिल्लोड व पूर्व माध्यमिक शिक्षण जि.प.प्रशाला सिल्लोड येथे झालेले आहे. त्यांचे माध्यमिक शिक्षण सिल्लोडच्या न्यू हायस्कूल या शाळेत पूर्ण झाले. उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षण सिल्लोडच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात त्यांनी घेतले. शालेय व महाविद्यालयीन जीवनापासून अब्दुल सत्तार यांना राजकारणाची व नेतृत्व करण्याची आवड होती. शाळेत असतांना मोनिटरच्या लढवायच्या तर महाविद्यालयामध्ये वर्ग प्रतिनिधी (सी.आर.) ची निवडणूक लढवून पदाधिकारी व्हायचे हा त्यांचा हतकंडा होता. याच दरम्यान त्यांनी १९८४ साली सिल्लोड – ग्रामपंचायतची निवडणूक लढवू जिंकली. बालपणापासून ते शुटींग बॉल, कबड्डी,खो-खो,क्रिकेट या सांघिक खेळांबरोबर गोळा फेक,लांब उडी, उंच उडी, व धावणे अशा वैयक्तिक खेळांमध्ये रुची घेत. खेळामुळेच त्यांच्यामध्ये राजकारण व नेतृत्व गुण निर्माण झाले. त्यांच्या राजकारणामध्ये राज्याचे माजी मंत्री कै.बाबूरावजी काळे, सहकार महर्षी कै. बाळासाहेब पवार, शिक्षण व सहकार महर्षी कै.माणिकरावजी पालोदकर यांच्यासोबत राजकारणामध्ये काम करण्याची व राजकारण शिकण्याची त्यांना संधी मिळाली. या नेत्यांसोबत काम करतांना त्यांनी प्रत्येकाकडून काहीनाकाही गुण आत्मसात करीत आपल्या राजकीय कार्यात त्याचा वापर करीत आपले नेतृत्व गुण विकसित करण्याचे काम केले. सिल्लोड ग्रामपंचायतीचे ०१ जानेवारी १९९० रोजी नगरपरिषदेत रुपांतर झाले.

नगरपरिषदेवर प्रशासक असतांना आपल्या खुबीने प्रशासकांकडून लोकांची कामे त्यांनी करून घेतली. अब्दुल सत्तार यांच्या पाठीशी कुठलाच राजकीय वारसा नसतांना स्वकतृत्वाने राजकीय फळावर आपला ठसा उमटवण्याचा सातत्याने प्रयत्न केला व त्यामध्ये त्यांना यश मिळत गेले. जो पर्यंत यश मिळत नाही मागे सरायचे नाही. व थांबायचे नाही हि सवय जोपासतांना राजकारणात घरचा खानदानीला कोणीच पंचायत समिती सदस्य झाला नाही. परंतु आपल्या कामाच्या शैलीच्या बळावर स्वभावगुणाने दिवसेंदिवस त्यांनी राजकीय परिवार, हितचिंतक, कार्यकर्ते, समर्थकांचा मोठा गोतवाळा निर्माण केला.

१९९४ साली सिल्लोड नगरपरिषदेची पहिली निवडणूक झाली. या पहिल्या निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाची अवस्था बिकट झाली होती. कॉंग्रेस पक्षाचे २७ सदस्य म्हणून केवळ पंजाचे पाचच सदस्य निवडून आले होते. त्यातही अब्दुल सत्तार यांच्यासह तिघेजण नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या शर्तीत होते. अब्दुल सत्तार यांच्यामध्ये समयसूचकते प्रमाणे निर्णय घेण्याची क्षमता असल्याने त्यांनी याच बळावर विरोधकांना आपले कसे बनवायचे हि कला त्यांच्या अंगात पहिल्यापासून असल्याने नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीत असलेले पक्षातील अशोक सूर्यवंशी यांना सोबत घेवून कॉंग्रेस पक्षाच्या तीन नगरसेवकाच्या बळावर भारतीय कम्युनिस्ट पक्ष, जनता दल व अपक्ष नगरसेवकांना आपल्याकडे आकर्षित करीत सिल्लोड नगरपरिषदेचे पहिल्या नगराध्यक्ष पदाचे पक्षाकडून उमेदवार म्हणून समोर येण्यास यश मिळविले. मतदानाच्या वेळी शिवसेना – भाजप युतीचे कै. उमेश कुलकर्णी व अब्दुल सत्तार यांना समान मते मिळाली. दोघांना समसमान मते मिळाल्याने चिठ्ठी टाकून सिल्लोडचा पहिला नगराध्य्क्ष निवडण्यात आला आणि नशिबाच्या जोरावर अब्दुल सत्तारांची चिठ्ठी निघाली व त्यांनी सिल्लोडचा पहिला नगराध्यक्ष होण्याचा बहुमान मिळाला. नगराध्य्क्ष पद अत्यंत काटेरी मुकुट सांभाळताना ०९ ऑगस्ट १९९६ रोजी अब्दुल सत्तार यांच्यावर स्वपक्षातील असंतुष्टानी शिवसेना – भाजप युतीच्या मदतीने अविश्वास आणून व पारित करून घेतला आणि अब्दुल सत्तार यांना नागरपरीषदेतून पायउतार व्हावे लागले. परंतु आलेल्या अविश्वासाला न जुमानता स्वत च्या ताकतीवर राजकारणात पुढेजान्याचे काम त्यांनी केले आणि पुन्हा त्यांना नगराध्य्क्ष पद मिळविले.
१९९९ साली सिल्लोड नगरपरिषद निवडणूकीत कॉंग्रेस पक्षात असतानाच आपली वेगळी चूल मांडत स्वबळावर समर्थकांना पक्षाची उमेदवारी मिळून दिली व बऱ्यापैकी यश हि मिळविले आणि खऱ्या अर्थाने याच निवडणुकीपासून सिल्लोड शहरात कॉंग्रेस पक्षाचे अस्तित्व निर्माण करण्याचे काम अब्दुल सत्तार यांनी सुरु केले. परंतु नगरपरिषदेच्या झालेल्या निवडणुकीत नगराध्य्क्ष पदाने त्यांना हुलकावणी दिली त्यांचा निसटता पराभव झाला मात्र एका वर्षातच त्यांनी पुन्हा नगराध्य्क्ष पद मिळविले. नगरपरिषदेच्या वीस वर्षाच्या सत्ता कार्यकाळात अडीच-तीन वर्षे सोडता पूर्ण कार्यकाळ अब्दुल सत्तार दाम्पत्यांनी नगराध्यक्ष म्हणून भूषविलेले आहे व आजही सत्ता त्यांच्याचकडे असून नगराध्यक्षपदी त्यांच्या पत्नी सौ. नफिसाबेगम अब्दुल सत्तार असून नगरपरिषदेच्या एकूण २९ सदस्यांपेकी अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसचे पंचवीस नगरसेवक आज स्भाग्रहात आहेत.

शैक्षणिक क्षेत्रामध्ये नेशनल एजुकेशन सोसायटी व प्रगती शिक्षण संस्था या शिक्षण संस्थेच्या माध्य्मातून मतदार संघासह परिसरात शिक्षणाचे जाळे पसरविले उर्दू, मराठी माध्यमाच्या प्राथमिक, माध्यमिक शाळा व उच्च माध्यमिक शाळाची व्यवस्था करून देताना मराठी माध्यमाचे वरिष्ठ महाविद्यालयीन शिक्षणाची देखील सोय केली. त्याचबरोबर उर्दू, मराठी माध्यमाचे अध्यापक विद्यालय (डी.टी.एड.) ची व्यवस्था करून देताना परिसरातील शेकडो कुटुंबातील शिक्षित व पात्र सदस्यांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. अब्दुल सत्तार यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकार बँक, सदस्य हज कमेटी, रोजगार हमी योजना पंचायत राज आदि शासकीय समित्यांसह विविध समित्यांवर काम करतांना भागातील शेतकरी, शेतमजूर व व्यापाऱ्यांची मदत करण्याचे काम केले. कॉंग्रेस पक्षाच्या संघटनेत काम करताना युवक कॉंग्रेस व कॉंग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष पदावर काम करतांना या मिळालेल्या संधीचा त्यांनी पुरेपूर पक्षासाठी वापर करीत पक्ष संघटना मजबूत करण्याचे काम केले. परिसरातील युवक, महिला, शेतकरी, शेतमजूर, व्यापारी आदि क्षेत्रातील सर्वसामान्य लोकांना कॉंग्रेस पक्षासोबत जोडण्याचे काम केलेले आहे.

१९९९ साली कॉंग्रेस पक्षाकडून सिल्लोड विधानसभेसाठी उमेदवारीची जोरदार मागणी पक्षाकडे केली. जनमत पाठीशी असतांना देखील कॉंग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळाली नाही. पक्षाची उमेदवारी न मिळाल्यामुळे परंतु कार्यकर्त्यांच्या आग्रहा खातर सिल्लोड विधानसभा मतदार संघातून अपक्ष उमेदवारी टाकून झालेल्या चौरंगी लढतीत दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवली. विशेष म्हणजे या निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार चौथ्या क्रमांकावर फेकले गेले होते. कॉंग्रेस पक्षातील तत्कालीन नेतृत्व कै.शंकररावजी चव्हाण यांनी अब्दुल सत्तार यांच्यातील नेतृत्व गुणाची चुणूक हेरली. तेव्हा ते कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब ठोंबरे काका व पक्षाचे माजी खासदार रामकृष्णबाबा पाटील यांच्या पुढाकाराने तत्कालीन मुख्यमंत्री कै. विलासराव देशमुख यांच्या उपस्थितीत कै.शंकररावजी चव्हाण यांच्या हस्ते अब्दुल सत्तार यांना कोंगेस पक्षात प्रवेश देण्यात आला. कै.शंकररावजी चव्हाण यांनी अब्दुल सत्तार यांना नुसता पक्षातच प्रवेश दिला नाही तर २००१ साली स्थानिक स्वराज्य संथा मतदार संघातून विधानपरिषदेची उमेदवारी मिळवून दिली. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपल्या विशेष राजकीय कार्यशैलीचा वापर करीत विरोधकांवर मात केली व विजय मिळवून विधानपरिषद सदस्य झाले.
विधानपरिषद सदस्य निवडून आल्यावर अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड तालुक्यासह औरंगाबाद –जालना जिल्हे कॉंग्रेसमय करण्याचा त्यांनी विडा उचलला आणि इतर पक्षातील चांगले कार्यकर्ते कॉंग्रेस पक्षात वळवून पक्ष मजबूत करण्याचे काम केले व लागलेल्या निवडणुकीत दोन्ही जिल्ह्यातील ज्या नगरपरिषदा भाजप-सेनेच्या युतीच्या ताब्यात होत्या त्या सर्व नगरपरिषदा खुलताबाद, वैजापूर, पैठण, गंगापूर, कन्नड, जालना, भोकरदन, परतूर या सर्व नगरपरिषदांवर कॉंग्रेस पक्षाचा तिरंगा फडकवीत स्थानिक संस्था पक्षाच्या ताब्यात आणल्या. विधान परिषद सदस्य म्हणून सिल्लोड विधानसभा मतदारसंघात मोठया प्रमाणात निधी खेचून आणला आणि विविध विकास योजना राबविण्याचे काम केले. त्याचबरोबर आपल्या ताकतीचा वापर करीत वरील सर्व नगरपरिषदांनाही विकास निधी मिळवून देण्याचे काम सातत्याने अब्दुल सत्तार यांनी केलेले आहे. अब्दुल सत्तार कॉंग्रेस पक्षात आल्यापासून जिल्ह्यात आजही जवळपास सर्व नगरपरिषदांमध्ये कॉंग्रेसचे वर्चस्व आहे.

पक्षात असतांनाही परंतु सर्व सामान्य जनता अडचणीत सापडल्यावर स्वंपक्षीय सरकारच्या विरोधात सिल्लोड-सोयगाव तालुक्यात दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली असतांना शेतकरी,शेतमजूर युवकांच्या हाताला काम व कामाचे दाम मिळावे यासाठी ऐतिहासिक मोर्चा काढला व वेळोवेळी जन प्रश्नांवर आंदोलन केली व लोकांच्या मदतीला धावून जाण्याचे काम केले.

कॉंग्रेस पक्षाने अब्दुल सत्तार यांच्या कामाची पद्धत पाहून २००४ साली सिल्लोड विधानसभा मतदार संघातून उमेदवारी दिली मात्र स्वंपक्षातील अनेकजण विरोधात उभे राहिले व पक्षातील अनेकांनी विरोधी पक्षाच्या उमेदवाराला मदत केल्याने अब्दुल सत्तार यांचा निसटता ३०१ मतांनी पराभव झाला. पराभवाने खचून न जाता पुन्हा जोमाने पक्षाचे काम करत राहिले. जनसंपर्क वाढवीत पक्षाची ताकत वाढविली. कॉंग्रेस पक्षाने अब्दुल सत्तार यांना पुन्हा सत्तेची ताकत देण्यासाठी २००७ मध्ये विधान परिषदेची उमेद्वारी देऊन संधी मिळवून दिली परंतु दुर्दैवाने त्या निवडणुकीत सत्तेतील मित्र पक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेसने अपक्ष उमेदवार मैदानात उतरवून अब्दुल सत्तार यांना शह देण्याचे कामे केले. कधी न थकणारा कार्यकर्ता म्हणून अब्दुल सत्तार यांची ओळख आहे. अधिक ताकतीने पक्षाचा व लोकांच्या कामासाठी रात्रंदिवस एक करून कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण केले.

२००९ साली त्यांना पक्षाने सिल्लोड विधानसभा मतदार संघातून उमेदवारी दिली.याच दरम्यान एकाकाळाचे त्यांचे राजकीय नेतृत्व असलेले परंतु काही कारणास्तव १९९६ ते २००८ पर्यंत दूर गेलेले जी.प.माजी अध्यक्ष प्रभाकरराव पालोदकर यांच्या सोबत त्यांचे राजकीय सुत जुळले व त्यांच्या मदतीने अब्दुल सत्तार यांनी विधानसभेची निवडणूक मोठ्या फरकाने जवळपास ३० हजार मताधिक्याने जिंकली व मतदार संघातील सेना-भाजपा युतीच्या सत्तेला रोक लावला या काळात त्यांनी मतदार संघात प्रचंड विकास योजना आणल्या सेना भाजपच्या १५ वर्षाच्या काळात त्यांनी मतदार संघात जितका विकास केला गेला नाही त्यापेक्षा कित्येक पटीने पाच वर्षात मतदार संघाचे विकास करण्याचे काम केले .सिल्लोड सोयगाव पंचायत समिती युतीच्या ताब्यातून खेचत कॉंग्रेसच्या ताब्यात आणण्याचे काम केले त्याचबरोबर औरंगाबाद जिल्हापरिषदेवर कॉंग्रेस मित्र पक्षाची सत्ता काबीज करण्यामध्ये अब्दुल सत्तार यांचे मोठे योगदान आहे. माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण यांनी त्यांना राज्यमंत्री पद दिले या एका वर्षात मिळालेल्या संधीचे सोने करण्याचे काम त्यांनी केले .

सिल्लोड –सोयगांव विधानसभा मतदार संघातील १६८ गावांमध्ये विविध विकास योजना राबविल्या. शेकडो किलोमीटर रस्ते करतांना खडीकरण, मजबुतीकरण, डांबरीकरण आणि सिमेंट रस्ते निर्माण केले.पाण्याची पातळी वाढविण्यासाठी सिंचन क्षेत्रात निल्लोड,चारनेर, पेंडगाव, जळकी (वसई) या मध्यम प्रकल्पासह शेकडो सिमेंट बांध, माती बांध, शेततळे, वनतळे व पाझर तलाव करण्याचे काम केले. त्याचबरोबर असलेले पाझर तलाव ,कोल्हापुरी बंधाऱ्यांची दुरुस्ती करण्याचे काम करून परिसरातील सिंचन क्षेत्र वाढविण्याचे काम केले. जवळपास चार वर्ष मंत्री पदापासून दूर राहिले तरीही विकास कामांची गती त्यांनी कमी होऊ दिली नाही. नुकतेच महिन्याभरापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराजजी चव्हाण यांनी त्यांना कैबिनेट मंत्री पद देऊन पशुसंवर्धन,दुग्धविकास व मत्स्य व्यवसायाचे खाते देऊन राज्यभर व मतदार संघाच्या परिसरात काम करण्याची संधी दिली.

शहराचा विकास साधतांना गतवर्षी भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असता अब्दूल सत्तार यांनी आपल्या अभिनव कल्पनेतून खेळना मध्यम प्रकल्पात चर खोदून पाणी प्रश्न सोडविण्याचा एक आगळा वेगळा प्रयत्न करून यश मिळवले. मिळालेल्या यशाचे कौतुक करण्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह मंत्री मंडळातील अनेक सदस्यांनी खेलना प्रकल्पाला भेट देऊन या पद्धतीने पाणी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविला जाऊ शकतो असा विचार करून खेळणात खोदलेल्या चराचे अभिनव उपक्रम राज्यात इतर ठिकाणी वापरल्याने पिण्याचे पाणी प्रश्न सोडविण्यास मदतीचे ठरले. मतदार संघाचा विविध मार्गाने निधी खेचून आणून चेहरा-मोहरा बदलण्याचे काम केले. शहरासह ग्रामीण भागातील अनेक ठिकाणी पायी चालणे शक्य नव्हते त्या ठिकाणी सर्व माध्यमाने रस्ते, पूल तयार करून रह्दारीचा मार्ग सुरळीत करण्याचे काम केले. सिल्लोड शहरात बहुतांश भागात सिमेंट रस्ते, नाल्या, पूल करण्यात आले. सामाजिक सभागृह, शादिखाने, मंगल कार्यालय आदीसह आरोग्य सेवा निर्माण केली आहे. मतदार संघात अनेक योजना राबवल्या सिल्लोडमध्ये जिल्हास्तरीय सर्व सुखसोयी युक्त असलेले रुग्णालय सिल्लोड-अजिंठा या दोन ठिकाणी ट्रौमा केअर सेंटर उभारले, शिशुसंघोपान केंद्र व महिला रुग्णालयाचे काम सुरु केले. शेतकऱ्यांना दुष्काळ, टंचाईग्रस्त, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, गारपीट झालेल्या नुकसानीची आर्थिक मदत मिळवून देण्याचे युद्ध पातळीवर प्रयत्न करून मोठया प्रमाणावर मदत मिळवून देण्याचे काम केले. महिलांना सक्षम करण्यासाठी महिला बचत गटांना मोठया प्रमाणात आर्थिक निधी अल्पदराने कर्ज मिळवून दिले. भविष्यात सिल्लोड मतदार संघ टकरमुक्त करण्याचा संकल्प असून शहरालाही भविष्यात भरपूर पाणीपुरवठा व्हावा यासाठी खडकपूर्णा धरणातून पाणीपुरवठा योजना, औरंगाबाद-फर्दापूर (चौपदरी रस्ता) शहरातील वाहतुकीची अडचण दूर व्हावी यासाठी दोन उड्डाणपूल घेण्यात येणार असून नागरिकांची कायदा न्यायालयीन अडचण दूर व्हावी यासाठी सिल्लोडमध्ये जिल्हासत्र न्यायालय सुरु करण्याचे व मतदार संघ सर्व सुखसोयीने संपन्न व्हावा असे अब्दुल सत्तार यांचे प्रयत्न आहेत.