प्रशासकीय विभागाचे नाव कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, मत्स्यव्यवसाय विभाग असे आहे. पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय विभागाचे शासनप्रमुख मंत्री (पदुम) असून त्यांना राज्यमंत्री (पदुम) सहाय्य करतात. विभागाच्या प्रशासकीय यंत्रणेची धुरा सचिव (पदुम) सांभाळतात. क्षेत्रीय पशुसंवर्धन यंत्रणेचे आयुक्त पशुसंवर्धन हे प्रमुख आहेत.
या प्रशासकीय संरचनेअंतर्गत आयुक्त, पशुसंवर्धन, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे कार्यालय पुणे येथे कार्यरत आहे. आयुक्तांना तांत्रिक व प्रशासकीय कामकाजात सहाय्य करण्यासाठी आयुक्तालयात एक अतिरिक्त आयुक्त पशुसंवर्धन, एक सहआयुक्त पशुसंवर्धन (मुख्यालय) हे अधिकारी तर विभागीय स्तरावर एकूण ७ प्रादेशिक सहआयुक्त, पशुसंवर्धन कार्यरत आहेत. पशुवैद्यकीय जैव पदार्थ निर्मिती संस्था आणि रोग अन्वेषण विभाग या संस्थाचे प्रमुख देखीलसहआयुक्त पशुसंवर्धन असून ते आयुक्तांच्या नियंत्रणाखाली कार्यरत आहेत.
जिल्हास्तरावर राज्यक्षेत्रीय योजना/कार्यक्रमाखाली पशुसंवर्धन कामकाजाचे नियंत्रण जिल्हा पशुसंवर्धन उप आयुक्त करतात तसेच जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा परिषद यांचेशी समन्वय ठेऊन संपूर्ण जिल्हयातील पशुसंवर्धन कामकाजाचे पर्यवेक्षण करतात. पशुसंवर्धन विभागाअंतर्गत मंजूर राजपत्रित आणि अराजपत्रित पदांनुसार एकूण एवढया अधिकारी व कर्मचारीवृंदाचे प्रशिक्षित मनुष्यबळ आहे.
पशुसंवर्धन आयुक्तालयातील तसेच आयुक्तालयांच्या अधिनस्थ व अधिपत्याखालील संस्था/कार्यालयांचा ढाचा पुढे दिल्यानुसार (ऑर्गनायझेशन ट्री स्वरुपात) आहे.
पशुसंवर्धन विभागाशी निगडित अन्य संस्था/प्रधिकरणे पुढीलप्रमाणे आहेत :
- महाराष्ट्र राज्य पशुवैद्यकीय परिषद, नागपूर
- महाराष्ट्र पशु व मत्स्यविज्ञान विद्यापीठ, नागपूर
- महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ, अकोला
- पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ, पुणे