प्रसिध्दीपत्रक

कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी सिल्लोड येथे बैठक संपन्न

ग्रामीण भागात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सिल्लोड व सोयगांव तालुक्याची संयुक्त आढावा बैठक सिल्लोड येथे राज्यमंत्री ना.अब्दुल सत्तार  साहेबांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी  खबरदारीचे उपाय म्हणून प्रभावी उपाय योजना करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित विभागांना दिले

अधिक वाचा

धुळे येथे कोरोना विषाणू संदर्भात सध्य स्थिती व त्यावर उपाय योजना करण्यासाठी आढावा बैठक

महसूल, ग्रामविकास राज्यमंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अब्दुल सत्तार साहेब यांनी आज धुळे येथे कोरोना विषाणू संदर्भात सध्य स्थिती व त्यावर उपाय योजना करण्यासाठी  आढावा बैठक घेतली. कोरोनाचा भविष्यातील धोका पाहता खबरदारी चा उपाय म्हणून तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यात यावे अशा सूचना ना.अब्दुल सत्तार साहेब यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. आरोग्य विभागातील रिक्त …

अधिक वाचा

मृत मुलींच्या कुटुंबियांना राज्यमंत्री अब्दुल सत्तार साहेबांकडून आर्थिक मदत

तळेगाव वाडी ता. भोकरदन येथे खेळत असतांना पाच शाळकरी मुलींचा परिसरातील तलावात बुडून मृत्यू झाला. या घटनेनंतर महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री ना.अब्दुल सत्तार साहेबांनी तळेगाव वाडी येथे सांत्वन भेट देऊन मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 20 हजार या प्रमाणे एक लाखाची स्वपदरची मदत दिली व शासनाकडून मदत मिळवून देण्याचे वचन दिले.

अधिक वाचा

सिल्लोड कोरोना मुक्त करण्यासाठी प्रत्येकाने संकल्प करा राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे आवाहन

सिल्लोड शहरातील व्यापारी व सुजाण नागरिकांनी तीन दिवसीय जनता कर्फ्यू करण्याचे ठरविल्याने या काळात सिल्लोड शहर निर्जंतुकीकरण करण्यासाठी नगरपरिषदेने नियोजनबद्ध जम्मो प्रोग्राम आखलेला असून धूर व हायपोक्लोराईड फवारणीच्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी राज्यमंत्री अब्दुल सत्तार साहेबांनी सिल्लोड कोरोना मुक्त करण्यासाठी प्रत्येकाने संकल्प करावा असे आवाहन यावेळी केले.

अधिक वाचा

बँकांनी शेतकऱ्यांना 7/12, फेरफार नक्कल मागू नये – राज्यमंत्री अब्दुल सत्तार.

शेतकऱ्यांना बँकेची कामे सहजरीत्या व कमी वेळात करता यावीत तसेच पिक कर्जासाठी ऑनलाईन 7/12, फेरफार नक्कल मागू नये अशा सूचना राज्यमंत्री अब्दुल सत्तार साहेब यांनी बँक अधिकाऱ्यांना दिल्या.

अधिक वाचा

सेना भवन सिल्लोड येथे शिवसेनेचा ५४ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.

जनसंपर्क कार्यालय सेना भवन सिल्लोड येथे शिवसेनेचा ५४ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करतांना राज्यमंत्री अब्दुल सत्तार साहेब.

अधिक वाचा

अतिवृष्टीतील नुकसानग्रस्तांना राज्यमंत्री अब्दुल सत्तार साहेबांच्या वतीने संसारउपयोगी साहित्य वाटप.

सोयगांव तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त कुटुंबाना राज्यमंत्री अब्दुल सत्तार साहेबांच्या वतीने संसारोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले.

अधिक वाचा

सिल्लोड येथे सामुहिक विवाह सामुहिक विवाह सोहळा संपन्न

सिल्लोड येथे नॅशनल एज्युकेशन सोसायटी व ना.अब्दुल सत्तार मित्र मंडळाच्या वतीने सालाबादप्रमाणे  सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सामुहिक विवाह सोहळ्यात २०० जोडप्यांचा विवाह पार पडला. यावेळी उपस्थित राज्यमंत्री अब्दुल सत्तार साहेब.

अधिक वाचा

अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त गावांची राज्यमंत्री अब्दुल सत्तार साहेब यांनी पाहणी केली

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या गावांची राज्यमंत्री अब्दुल सत्तार साहेब यांनी प्रत्यक्ष पाहणी करून  झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. यावेळी नुकसानग्रस्तांना मदत करण्यास सरकार कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.

अधिक वाचा

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने सिल्लोड येथे सामाजिक कार्यक्रम.

राज्यमंत्री अब्दुल सत्तार साहेब यांच्या मार्गदर्शनात व युवानेते अब्दुल समीर साहेब यांच्या नेतृत्वाखाली सिल्लोड येथे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने  विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.

अधिक वाचा