प्रसिध्दीपत्रक

उपजिल्हा रुग्णालयाला आ.अब्दुल सत्तार यांनी दिली भेट.

अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी रुग्णालयातील रुग्णांशी संवाद साधून रुग्णालयातील स्वच्छतेचा आढावा घेतला. नागरिकांच्या सुविधेसाठी आजपासून ‘साथरोग निर्मलन मोहिमे’चा आरंभ होत आहे.

अधिक वाचा

शासकीय रुग्णालयाची आमदार अब्दुल सत्तार यांनी केली पाहणी.

नागरिकांमध्ये डेंग्यू, मलेरिया यासारख्या आजाराविषयी भिती निर्माण झालेली आहे. या अनुषंगाने आमदार अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयाला भेट दिली. येथील उपाययोजना व स्वच्छतेची पाहणी करून त्यांनी रुग्णांशी सवांद सुद्धा साधला. यासोबतच खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा परिषद व उपजिल्हा रुग्णालय यांच्या सयुंक्त विद्यमाने शहरात साथरोग निर्मुलन मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.

अधिक वाचा

भाजपा सरकारचे नियंत्रण पवारांच्या हाती – अब्दुल सत्तार.

औरंगाबाद येथे अब्दुल सत्तार साहेबांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी अब्दुल सत्तार साहेब म्हणाले की सध्याचे भाजपा सरकार हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या पाठिंब्याच्या आधारावर असल्यामुळे हे सरकार फार काळ तग धरू शकणार नाही.

अधिक वाचा

पं. नेहरुचे जीवनकार्य सदैव प्रेरणादायी- अब्दुल सत्तार.

स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आयुष्यभर दीनदलित व सर्वसामान्यांना सोबत घेऊन देशाचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांचे जीवन कार्य हे समाजासाठी कायम प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री व विद्यमान आमदार अब्दुल सत्तार यांनी केले आहे.

अधिक वाचा

भाजपा थोड्याच दिवसाचे सरकार- अब्दुल सत्तार.

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या १२५ व्या जयंतीचा कार्यक्रम, कॉंग्रेस पक्ष सदस्य नोंदणीचा कार्यक्रम व त्याच प्रमाणे अब्दुल सत्तार साहेब यांच्या सत्काराचा कार्यक्रम औरंगाबाद येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमामध्ये बोलतांना अब्दुल सत्तार साहेब म्हणाले कि, भाजपा सरकार हे राष्ट्रवादीच्या आधारावर अवलंबून असून ते कधी कोसळेल याचा नेम नाही त्यामुळे कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी …

अधिक वाचा

अजिंठा येथील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी बैठक.

अजिंठा हे गाव येथील लेण्यामुळे जगप्रसिद्ध आहे. या लेण्या बघण्यासाठी जगभरातून पर्यटक येतात. अजिंठा या गावामध्ये कॉंग्रेसच्या कार्यकाळामध्ये पाणीपुरवठा योजना सुरु केली होती, परंतू सदरील योजनेद्वारा पाणीपुरवठा वितरण व्यवस्थित होत नसल्यामुळे आमदार अब्दुल सत्तार यांनी बैठकीमध्ये तहसीलदार यांना पाणीप्रश्न सुरळीत करण्यायासंदर्भात सूचना दिल्या आहेत.

अधिक वाचा

सिल्लोड येथे विराट मोर्चा संपन्न.

आमदार अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वाखाली सिल्लोड शहरामध्ये विराट मोर्च्याचे आयोजन करण्यात आले होते. मोर्चा मध्ये नागरिकांना उद्देशून ते म्हणाले कि भाजपा सरकार हे केवळ मर्यादित लोकांचे सरकार आहे. सत्तेत येण्यापूर्वी भाजपा नेत्यांनी जनतेला खूप आश्वासने दिली आहेत. भाजपा सरकार ने जनतेला दिलेले आश्वासन नाही पाळले तर येणाऱ्या काळामध्ये आपण तीव्र आंदोलन करणार असल्याचे या वेळी …

अधिक वाचा

दुष्काळग्रस्त तालुक्यांची लवकर घोषणा करावी- अब्दुल सत्तार.

सिल्लोड येथे अब्दुल सत्तार साहेब यांच्या नेतृत्वाखाली प्रचंड मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मोर्चा मध्ये बोलताना अब्दुल सत्तार म्हणाले की, सिल्लोड व सोयगांव तालुक्याबरोबरीने मराठवाड्यातील इतरही तालुक्यांना दुष्काळग्रस्त जाहीर करावे अशी मागणी अब्दुल सत्तार यांनी यावेळी केली.

अधिक वाचा

दुष्काळ जाहीर करण्यासाठी आयोजित मोर्चा मध्ये समर्थकांची प्रचंड गर्दी.

आमदार अब्दुल सत्तार साहेब यांच्या नेतृत्वामध्ये सिल्लोड येथे विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चा मध्ये असंख्य शेतकरी व कार्यकर्ते सामील झाले.

अधिक वाचा

तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यासाठी सिल्लोड येथे विराट मोर्चा.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी व सिल्लोड सोयगाव तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर करण्यासाठी विद्यमान आमदार अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वाखाली सिल्लोड येथे भव्य मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चामधील जनसमुदायाला उद्देशून बोलतांना ते म्हणाले की भाजपा सरकारने सत्तेत येण्यापूर्वी जनतेला जे आश्वासन दिले आहेत ते पूर्ण करावे, नाहीतर शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी यापुढे रस्त्यावर उतरून आंदोलन करू अशा इशारा त्यांनी …

अधिक वाचा