सिल्लोडच्या आठवडी बाजाराचे नाव सर्वत्र प्रसिद्ध आहे. जवळपासच्या ६० कि.मी. अंतरावरील सर्वात मोठा आठवडी बाजार सिल्लोड येथे भरतो. सध्याच्या जागेवर बाजारात खरेदी-विक्री करणार्यांना जागा कमी पडत आहे. यामुळे बाजाराच्या दिवशी शहरात सर्वत्र कोंडी होते. यामुळे आठवडी बाजार स्थलांतरीत करून तेथे सर्व सुविधा उपलब्ध करण्यात येतील. यासाठी नवीन विकास आराखड्यामध्ये सर्व्हे नं. १२२, १२३ मध्ये ५ एकर जागेवर आरक्षण मंजूर झाले आहे. येथे आठवडी बाजाराचा विकास करून पार्किग, रस्ते, लाईट, धरम काटा, पार्किंग यासारख्या सर्व सुविधा असतील.
वैशिष्ट्यपुर्ण योजना, वित्तआयोग, नगोरोत्थान योजनेअंतर्गत यासाठी अंदाजे ५० लाख रुपये खर्च करण्यात येईल.