शहराच्या सुरक्षेसाठी

DSC_7372

कापुस उत्पादनात आघाडीचा परिसर व कॉटन जिनींगची राजधानी म्हणुन सिल्लोड शहराची ख्याती आहे. जिqनग प्रेसींग येथे मोठ्या प्रमाणात आहे. व्यापाराचे प्रसिध्द शहर म्हणुनही सिल्लोडचे नाव लौकीक आहे. पुर्वी शहरामध्ये आग लागण्याच्या दुर्घटणा घडलेल्या आहेत. आग लागल्याने व्यापारी बांधवांचे व्यवसाय उध्वस्त होतात. त्यामुळे सुरक्षेचा उपाय म्हणुन सिल्लोड नगर परिषदेने आ.अब्दुल सत्तार यांच्या पाठपुराव्यामुळे अग्नीशामक सक्षमीकरण योजने अंतर्गत ८० लक्ष रुपये खर्चून अग्नीशामक बंबासह वाहन, तसेच प्रशिक्षण केंद्र, कर्मचारी निवासस्थान व अधिकाऱ्यांसाठी सुसज्ज कार्यालय उभारण्यात आले आहे.

DSC_7377