खडकपूर्णा योजनाङ्क

सिल्लोड शहराला आज खेळणा मध्यम प्रकल्पातून पाणी पुरवठा करण्यात येतो. या पाणीपुरवठा योजनेतून प्रतिव्यक्ती ७० लि. या प्रमाणे पाणी पुरवठा करण्यात येतो. पाण्याच्या उपलब्धतेनुसार हा पाणी पुरवठा पुरेसा नाही. शिवाय शहर प्रगतीच्या वाटेवर असल्याने येथे नवीन नागरी वस्त्या वाढत आहे. भविष्यामध्ये पुरेसे पाणी न मिळाल्याने भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. यासाठी मा. आ. अब्दुल सत्तार यांनी हा प्रश्न विधानसभेमध्ये लावून धरल्याने बुलडाणा जिल्ह्यात झालेल्या खडकपूर्णा धरणामध्ये सिल्लोड शहराला पिण्याच्या पाण्यासाठी ४.४५७ दशलक्ष घनमीटर इतके आरक्षण मिळाले आहे. आ. अब्दुल सत्तार यांच्या प्रयत्नाने सिल्लोड – भोकरदन पाणीपुरवठा योजनेला राज्य शासनाने तत्वता मंजुरी दिली आहे. त्या अनुषंगाने याबाबत सर्वेक्षण करण्याचे काम पूर्ण झाले असून योजनेचे अंदाजपत्रक करण्याचे काम प्रगतिपथावर आहे. खडकपूर्णाचे पाणी सिल्लोडला आल्यानंतर प्रतिव्यक्ती १३५ लिटर याप्रमाणे पाणी पुरवठा करण्यात येणार असून या योजनेमुळे २०४० पर्यंत शहरवासीयांचा पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. शिवाय यामुळे सिल्लोडच्या औद्योगिक क्षेत्राचाही मोठा विकास होणार आहे. आजची अस्तीतवात असलेली पाणी पुरवठा योजना ही सन २०३६ पर्यंत मंजुर आहे. मात्र दुरदृष्ब्ी असलेले मा. आ. अब्दुल सत्तार यांनी आत्तापासुनच शहराच्या ५० वर्षाच्या भविष्यासाठी आजच आराखडा मंजुर केला आहे.

Khadakpurna-3

Khadakpurna-2