प्रकाशमय सिल्लोड

नगर परिषदेला विजेचे लाखो रुपये बील येत असे. शिवाय शहरात पुरेशी विद्युत रोषणाई होत नव्हती. ऊर्जा संवर्धन गरज काळाची, जोपासना राष्ट्रहिताची याप्रमाणे मा. आ. अब्दुल सत्तार यांच्या प्रयत्नाने मा. मुख्यमंत्री ना. पृथ्वीराज चव्हाण यांनी सिल्लोड शहराला प्रकाशमय करण्यासाठी १ कोटी रुपयांची भरीव मदत केली. वैशिष्ट्यपूर्ण योजना विशेष अनुदान निधीतून सिल्लोड शहरात सोडीयम व्हेपर लॅम्प काढून पूर्ण म्हणजे १००% उऋङ प्रणाली कार्यान्वित केली.

त्याचबरोबर मंदिर, मशीद, स्मशानभूमी, कब्रस्तान येथेही प्रखर विद्युत रोषणाई करण्यात आली. शहरातील प्रत्येक चौकामध्ये जास्त उऋङ बल्प लावून सौंदयपूर्वक विद्युत रोषणाई करण्याचे काम प्रगतिपथावर आहे.

तसेच शहरातील अब्दलशाह नगर भागातील हरी मशीद व डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरामध्ये १२ लक्ष रुपये खर्च करून नवीन हायमस्ट बसविण्यात आले. १००% उऋङ प्रणाली कार्यान्वित केल्याने विजेमध्ये ७५% बचत होऊन वीज बिलामध्ये लाखो रुपयांची बचत झाली आहे. आज शहरातील प्रत्येक जुन्या-नव्या भागामध्ये विद्युत रोषणाई करण्यात आली असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा व जामा मशीद परिसर, प्रियदर्शनी चौक, हरी मशीद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर येथे हायमस्ट बसविण्यात आल्याने सिल्लोड शहर प्रकाशमय झाले आहे.

विद्यृत पथदीवे दुरूस्तीसाठी घेतलेली हॅड्रोलीक टाटा

शहराचा मुख्य रस्ता

DSC_0198

DSC_0081

DSC_0088

DSC_0986

DSC_0988