सांस्कृतिक क्षेत्राला चालना

DSC_7721

सिल्लोड शहराला सांस्कृतिक क्षेत्राचा मोठा वारसा लाभलेला आहे. या सांस्कृतिक क्षेत्राला चालना देण्यासाठी मा. आ. अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी विविध सांस्कृतिक कार्यक्रम गेल्या १५ वर्षापासून अविरतपणे घेतल्या जातात. या माध्यमातून शहरामध्ये शिवरायांच्या कौटुंबिक इतिहासाची साक्ष देणारी देशातील प्रसिद्ध मराठी नाट्य ‘रायगडाला जेव्हा जाग येतेङ्क ज्यांनी देशभरात कव्वालीच्या माध्यमातून देशभक्तीचा संदेश देण्याचे काम केले ते ख्यातनाम कव्वाल अहेसान भारती घुंगरूवाले यांचा कव्वालीचा कार्यक्रम, लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांच्या लावण्याचा कार्यक्रम, देशस्तरावरील मुशायरेचा कार्यक्रम यासारख्या प्रसिद्ध व नामवंत दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रम दरवर्षी उत्साहात साजरे केले जातात. सिल्लोड शहर व परिसरातील कलावंतांना व्यासपीठ मिळावे यासाठी आ. अब्दुल सत्तार यांच्या पुढाकाराने हळदा ता. सिल्लोड येथे राज्यस्तरीय ग्रामीण पर्यटन महोत्सव घेण्यात आला. यावेळी अनेक कलावंतांनी आपली कला या व्यासपीठावर सादर केली. सिल्लोड येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रम दरवर्षी साजरे करून मा.आ. अब्दुल सत्तार यांनी ‘सांस्कृतिक वारसाङ्क जोपासण्याचे जे कार्य केले ते इतरत्र जवळपास कोणत्याच राजकीय पुढाèयाने केले नाही.

DSC_5457