सिल्लोड नगर परिषदेने मा. आ. अब्दूल सत्तार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक बेघरांना सुंदर घर मिळावे यासाठी खास योजनाबध्द आराखडा बनविला आहे. त्याअनुषंगाने सिल्लोड शहरातील ७८ लाभार्थ्यांना पहिल्या टप्यामधे रमाई आवास योजने अंतर्गत प्रत्येकी १५०,०००/- रुपयांचे १००% अनुदान वाटप करण्यात आले आहे. तसेच सिल्लोड नगर परिषदेच्या वतीने रमाई घरकुल योजने अंतर्गत दारिद्र्य रेषेखलील लाभार्थ्यांना दोन ब्लँकेट, दोन रग व सौर उर्जेवर चालवणाऱ्या कंदीलांचे वाटप करण्यात आले. या योजने अंतर्गत अनु. जाती व नवबौध्दांसाठी वैयक्तीक शौचालय व नळजोडणी साठी पात्र लाभार्थ्यांना एकूण १६०००/ रुपये देण्याचा प्रस्ताव मंजूर असून निधी प्राप्त होताच हे वाटप करण्यात येणार आहे.
येत्या काळामध्ये अल्पसंख्यांक कुटूबांना, दारिद्य्र रेषेखालील कुटूबांना तसेच qहदू व दलीत बेघर बांधवांना घरे देण्यासाठीची योजना प्रस्तावित आहे.
सिल्लोड नगर परिषदेच्या वतिने रमाई घरकुल योजने अंतर्गत दारिद्र्य रेषेखालील लाभार्थ्यांना दोन ब्लँकेट, दोन रग व सौर उर्जेवर चालणार्या कंदीलांचे वाटप करतांना आ. अब्दुल सत्तार, अ. समीर अ. सत्तार, प्रा. मन्सुर कादरी, सुनिल दुधे, विठ्ठल सपकाळ व लाभार्थी दिसत आहेत.
घरकूल मिळालेले लाभार्थी आपल्या सुंदर घरकुलासह दिसत आहे.