तालुका क्रिडा संकुल

Thyagaraj-Sports-Complex

युवकांमध्ये क्रिडा विषयांबाबत विशेष आकर्षण असते. मा. आ. अब्दुल सत्तार यांच्या प्रेरणेने सिल्लोड येथे झालेल्या अखील भारतीय शुटींग बॉल स्पर्धा व नगराध्यक्ष चषक स्पर्धा या निमित्ताने सिल्लोड ला खेळाडूंची मोठी संख्या आहे व येथे तालुका क्रीडा संकुलाची गरज आहे हे पहायला मिळाले, पुर्वी विकास आराखडा प्रलंबीत असल्यामुळे हे शक्य झाले नाही.

मात्र आता नविन विकास आराखडा मध्ये सर्व्हे नं. ९१ मध्ये तालुका क्रिडा संकुलासाठी २ हेक्टर ८० जागा आरक्षीत झाली असून या जागेवर खेळाडूंसाठी तालूका क्रिडा संकुल उभारण्यात येईल.

येथे युवकांना क्रिडांचे प्रशिक्षण, स्टेडियम ला लागुन स्वीम्मिंग पुल, हेल्थ क्लब, प्रखर विद्युत रोषणाई व अत्याधुनिक साहित्यासह उपलब्ध असेल. शिवाय शासनाने विकास आराखड्यामध्ये शहराच्या विविध ठिकाणी एकुण १८ जागेंवर क्रिडांगणासाठी आरक्षण केले आहे. या जागेवर लोकवस्तीनुसार क्रिडांगण उभारण्यात येईल.
केंद्र शासन, क्रिडा विकास निधी वैशिष्ट्यपुर्ण योजना यातुन अंदाजे १ कोटी रूपये खर्च अपेक्षीत आहे.

health_club

Junction,_TX,_swimming_pool_IMG_4344