आ.अब्दुल सत्तार साहेब यांचा पूर्णेश्वर संस्थानाच्या वतीने सत्कार.

Punya Nagariविधानसभा निवडणुकीमध्ये सिल्लोड-सोयगाव मतदारसंघातून अब्दुल सत्तार साहेब दुसऱ्यांदा प्रचंड मतांनी निवडून आले आहेत. या विजयाबद्दल नवनिर्वाचित आमदार अब्दुल सत्तार साहेबांचा सिल्लोड शहरातील पूर्णेश्वर गणपती संस्थानाच्या वतीने सत्कार करण्यात आला. अब्दुल सत्तार यांनी मागील पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये पूर्णेश्वर गणपती संस्थानासाठी विद्युत पोल व रस्त्याची सोय उपलब्ध करून दिली आहे.यापुढेही आपण तीर्थस्थळाचा विकास करण्यासाठी सदैव कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.