प्रसिध्दीपत्रक

माजी राज्यमंत्री अब्दुल सत्तार साहेब आणि समर्थकांच्या वतीने मुख्यमंत्री मा.ना.एकनाथरावजी शिंदे साहेब यांचा मुंबई येथे नागरी सत्कार संपन्न.

सिल्लोड मतदारसंघात कोट्यावधी रुपयांच्या विकास कामांना मंजुरी दिल्याबद्दल माजी राज्यमंत्री अब्दुल सत्तार साहेब यांच्यासह हजारो समर्थकांच्या वतीने मुंबई येथील रवींद्र नाट्य मंदिरात मुख्यमंत्री ना.एकनाथरावजी शिंदे साहेब यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा संपन्न झाला. यावेळी आमदार संदीपान भुमरे, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार प्रकाश आबेटकर, अब्दुल आमेर अब्दुल सत्तार आदींसह सिल्लोड-सोयगांव मतदारसंघातील हजारो पदाधिकारी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

अधिक वाचा

मा.ना.अब्दुल सत्तार साहेब यांच्या पुढाकाराने सिल्लोड तालुक्यात उभारण्यात येणाऱ्या नॅशनल सहकारी सूतगिरणीची शासकीय आर्थिक सहाय्यासाठी निवड

सिल्लोड तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळावा तसेच कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा यासाठी महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री ना. अब्दुल सत्तार साहेब यांच्या पुढाकाराने सिल्लोड येथे नॅशनल सहकारी सूतगिरणी प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या सूतगिरणीची मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत विशेष बाब म्हणून 81 कोटी रुपयांच्या शासकीय अर्थसहाय्यासाठी निवड करण्यात आली असून लवकरच सूतगिरणी उभारणीचा शुभारंभ …

अधिक वाचा

राज्यमंत्री ना. अब्दुल सत्तार साहेब मित्र मंडळाच्या वतीने सिल्लोड येथे इफ्तार पार्टी संपन्न.

राज्यमंत्री ना. अब्दुल सत्तार साहेब मित्र मंडळाच्या वतीने सालाबादप्रमाणे सिल्लोड येथे इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.  यावेळी महसूल तथा ग्रामविकास  राज्यमंत्री अब्दुल सतार साहेब व माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या इफ्तार पार्टीत सर्वधर्मीय बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. सामाजिक एकात्मतेचे दर्शन या इफ्तार पार्टीत दिसून आले. यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, …

अधिक वाचा

राज्यमंत्री ना. अब्दुल सत्तार साहेबांच्या पुढाकाराने फर्दापूर येथे उभारणार शिवस्मारक व भिमपार्क

महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री ना. अब्दुल सत्तार साहेब यांच्या पुढाकाराने सोयगांव तालुक्यातील फर्दापूर येथे अजिंठा लेणी परिसरात भव्य शिवस्मारक तसेच भिमपार्क उभारण्यात येणार आहे. शिवस्मारक व भीमपार्कचे काम गतीने पूर्ण करण्याच्या सूचना राज्यमंत्री अब्दुल सत्तार साहेब यांनी संबंधित अधिकाऱ्यांना वेळोवेळी बैठकीत दिल्या आहेत. जगप्रसिद्ध अजिंठा लेणीच्या पायथ्याशी जागतिक पातळीवर उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज व …

अधिक वाचा

राज्यमंत्री ना.अब्दुल सत्तार साहेब यांचा जननायक पुरस्काराने गौरव

सिल्लोड-सोयगांव मतदारसंघात शिवस्मारक,भीमपार्क उभारण्याच्या महत्वाकांक्षी योजनेसह, विविध तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी भरीव निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री ना.अब्दुल सत्तार साहेब यांना अखिल भारतीय आखाडा परिषद, जिल्ह्यातील प्रमुख देवस्थान व शिवशारदा शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने जननायक या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शिवशारदा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव कृष्णा लहाने यांनी आयोजित केलेल्या मातृपितृ कृतज्ञता सोहळा समारोपप्रसंगी

अधिक वाचा

पूर्णा नदीपात्रात उभारण्यात येणार ७ अत्याधुनिक बॅरेजेस, नदीमध्ये पायी चालून राज्यमंत्री अब्दुल सत्तार साहेब व अधिकाऱ्यांनी केली सर्वेक्षण

सिंचन क्षेत्रात वाढ करून तालुक्यातील शेतकरी समृद्ध होईल या हेतूने पूर्णा नदीच्या पात्रात अत्याधुनिक बॅरेजेस बांधण्याच्या कामाचे अंतिम सर्वेक्षण करण्यात आले. महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री ना.अब्दुल सत्तार साहेब यांच्यासह अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी सिल्लोड तालुक्यातील भवन ते केऱ्हाळा ते खोडकाईवाडी नदीपात्रात ६ की.मी. पायी चालत बॅरेजेसच्या नियोजित जागेची पाहणी केली.  सदरील बॅरेजेसचे काम पूर्ण झाल्यानंतर जवळपास …

अधिक वाचा

सिल्लोड शहरात प्रवेशद्वारावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळ्याची स्थापना.

सिल्लोड शहरातील मुख्य रस्त्यावर नगर परिषदेच्या वतीने साकारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वारावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य अश्वारूढ पुतळा स्थापन करण्यात आला. यावेळी फटाक्यांची आतषबाजी व जय भवानी,  जय शिवाजीच्या जयघोषाने अवघे शहर दुमदुमून गेले होते. यानिमित्ताने शहरात छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याची मिरवणूक काढण्यात आली. महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार साहेब यांच्याहस्ते महाराजांच्या …

अधिक वाचा

महसूल, ग्रामविकास, बंदरे, खार जमिनी विकास व विशेष सहाय्य राज्यमंत्री ना. अब्दुल सत्तार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्ताने वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेला विशेषांक. (01.01.2022)

महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री ना. अब्दुल सत्तार साहेब यांचा वाढदिवस विविध सामाजिक कार्यक्रमांनी संपन्न झाला. वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम अंतर्गत सिल्लोड येथे आयोजित महारक्तदान शिबिरास व सर्वरोगनिदान शिबिरास नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. आयोजित रक्तदान शिबिरात उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्यासह 251 रक्तदात्यांनी रक्तदान केले तर 5 हजार नागरिकांनी मोफत सर्वरोगनिदान शिबिराचा लाभ घेतला. राज्यमंत्री अब्दुल सत्तार साहेब …

अधिक वाचा

ग्रामविकास विभागामार्फत “महाआवास अभियानाचा” शुभारंभ

गरिबांच्या घरांचे स्वप्न साकार करण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या ग्रामविकास विभागांतर्गत “महाआवास अभियानाचा” शुभारंभ मुख्यमंत्री मा.ना.उद्धवजी ठाकरे साहेबांच्या शुभहस्ते संपन्न झाला. यावेळी ग्रामविकास मंत्री ना.हसन मुश्रीफ साहेब, महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री ना. अब्दुल सत्तार साहेब यांची उपस्थिती होती.

अधिक वाचा

दिवाळी सणाच्या निमित्ताने शिवसेनेच्या वतीने गरजू व गोरगरिबांना कपडे व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री ना.अब्दुल सत्तार साहेब यांचे जनसंपर्क कार्यालय सेनाभवन येथे शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

अधिक वाचा