Archive for जून, 2015

आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या प्रयत्नांना यश.

अल्पसंख्याकबहुल ग्रामपंचायतींना पायाभूत सुविधा मिळाव्यात यासाठी आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या प्रयत्नाने सोयगाव व सिल्लोड तालुक्यातील २० अल्पसंख्याकबहुल ग्रामपंचायतींची अल्पसंख्याकबहुल क्षेत्र विकास योजनेअंतर्गत निवड झाली आहे. त्यामुळे आता अल्पसंख्याकबहुल वस्त्यांचा विकास शक्य होणार आहे.

अधिक वाचा

कारखान्याचे वाटोळे करणाऱ्यांच्या हाती संस्था सोपविणार का ?- आ. अब्दुल सत्तार.

सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे ज्यांनी वाटोळे केले त्यांच्या हाती सिद्धेश्वर वस्त्रोद्योग सहकारी संस्थेची सत्ता देणार काय ? असा प्रश्न आ. अब्दुल सत्तार साहेबांनी जाहीर सभेत उपस्थित जन समुदायास केला. ते संस्थेच्या संचालक मंडळाच्या निवडणुक प्रचार सभेत बोलत होते.

अधिक वाचा

शेतकऱ्यांनी शेंद्रीय पद्धतीने शेती करावी- आ. अब्दुल सत्तार.

शेतीची गुणवत्ता व शेतीचा पोत वाढवायचा असेल तर शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळले पाहिजे असे मत माजी मंत्री व आ. अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड येथील संतकृपा पतंजली किसान सेवा केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले.

अधिक वाचा

जिल्हा निवड समिती औरंगाबाद अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती

जिल्हा निवड समिती औरंगाबाद अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती करण्यात येत आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेद्वारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. अधिक माहितीसाठी कृपया उमेद्वारानी www.aurangabadexam.com किंवा www.aurangabad.nic.in या संकेतस्थळाला शेवट दिनांक २९ जून २०१५ पूर्वी भेट देवून आपले अर्ज सादर करावेत. अन्य नोकरी संदर्भातील अधिक माहितीसाठी कृपया www.abdulsattar.in या संकेत संकेतस्थळाला वेळोवेळी भेट दयावी.

अधिक वाचा

जिल्हा निवड समिती बीड अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती.

जिल्हा निवड समिती बीड अंतर्गत विविध पदांसाठी ऑनलाइन पद्धतीने पदभरती करण्यात येत आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेद्वारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. अधिक माहितीसाठी कृपया उमेद्वारानी www.beed.nic.in या संकेतस्थळाला शेवट दिनांक २९ जून २०१५ पूर्वी भेट देवून आपले अर्ज सादर करावेत. अन्य शासकीय नोकरी संदर्भातील अधिक माहितीसाठी कृपया www.abdulsattar.in या संकेत संकेतस्थळाला वेळोवेळी भेट …

अधिक वाचा

जिल्हा निवड समिती औरंगाबाद अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती.

जिल्हा निवड समिती औरंगाबाद अंतर्गत विविध पदांसाठी ऑनलाइन पद्धतीने पदभरती करण्यात येत आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेद्वारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. अधिक माहितीसाठी कृपया उमेद्वारानी www.aurangabadexam.com किंवा www.aurangabad.nic.in या संकेतस्थळाला शेवट दिनांक २९ जून २०१५ पूर्वी भेट देवून आपले अर्ज सादर करावेत. अन्य शासकीय नोकरी संदर्भातील अधिक माहितीसाठी कृपया www.abdulsattar.in या संकेत संकेतस्थळाला …

अधिक वाचा

भाजपा सरकार शेतकरी विरोधी- आ. अब्दुल सत्तार.

युवक कॉंग्रेसतर्फे जालना लोकसभा मतदारसंघाचे अध्यक्ष अब्दुल समीर यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या राहुल गांधी संदेश पदयात्रेच्या समारोप निमित्त सिल्लोड येथे अध्यक्षीय भाषणात बोलतांना आ. अब्दुल सत्तार साहेब म्हणाले की खोटी आश्वासने देत सत्तेवर आलेल्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारने एक वर्षाच्या काळात एकही कल्याणकारी निर्णय घेतला नसून भूमीअधिग्रहण कायदा करून पंतप्रधानांनी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे.

अधिक वाचा

कै. माणिकदादा पालोदकरांना त्यांच्या जयंतीनिमित्त सिल्लोड येथे अभिवादन.

सिल्लोड येथे सिद्धेश्वर अर्बन बँकेत सहकार महर्षी कै. माणिकदादा पालोदकर यांच्या जयंती निमित्त आ. अब्दुल सत्तार साहेबांनी कै. माणिकदादा पालोदकरांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन केले. या प्रसंगी आ. अब्दुल सत्तार साहेबांसोबत प्रभाकररावजी पालोदकर, रामदास पालोदकर, व इतरही प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होते.

अधिक वाचा

आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते मृताच्या कुटुंबियांना आर्थिक मदत.

सिल्लोड तालुक्यातील पिंपळदरीवाडा येथील शेतकरी संजय आनंदा अंभोरे यांचा दिनांक ७ जून रोजी वीज पडून मृत्यू झाला. आ. अब्दुल सत्तार साहेबांनी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेवून सांत्वन केले. याप्रसंगी आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते एक लाख पन्नास हजार रुपयांचा धनादेश मृतांच्या कुटुंबियांना सुपूर्द करण्यात आला.

अधिक वाचा

आमसभेत नागरिकांनी मांडल्या समस्या.

सिल्लोड पंचायत समितीच्या प्रांगणात आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या अध्यक्षतेखाली वार्षिक आमसभेचे आयोजन करण्यात आले होते. नागरिकांनी विविध प्रश्न या आमसभेत मांडले यावर आ. अब्दुल सत्तार साहेबांनी संबधित अधिकाऱ्यांना नागरिकांच्या समस्या लवकरात लवकर सोडविण्याच्या सूचना केल्या आहेत.

अधिक वाचा