Archive for जुलै, 2020

मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त जोशिंदा काढा वाटप.

मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त तालुका शिवसेनेच्या वतीने कोरोना योद्धे तसेच नागरिकांची रोगप्रतिकारशक्ती वाढीसाठी महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार साहेबांच्या पुढाकाराने तसेच युवानेते अब्दुल समीर यांच्या मार्गदर्शनाखाली जोशिंदा काढा वाटपाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी तहसिल कार्यालायासाहित इतर कार्यालयांत शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या हस्ते जोशिंदा काढा वाटप करण्यात आला.

अधिक वाचा

सोयगांवला १०० खाटांचे रुग्णालय उघडण्यासाठी राज्यमंत्री अब्दुल सत्तार साहेबांचा पाठपुरावा

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून सोयगांव येथे १०० खाटांचे रुग्णालय उभारण्यात यावे अशी मागणी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर आयोजित  व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे राज्यमंत्री अब्दुल सत्तार साहेबांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे केली.

अधिक वाचा

अब्दुल सत्तार साहेब करणार सिल्लोडमध्ये जोशिंदा (मालेगांवचा) काढा वाटप.

राज्यमंत्री अब्दुल सत्तार साहेब कोरोना पासून बचाव करण्यासाठी मतदारसंघातील नागरिकांची रोगप्रतिकार शक्ती वाढवावी यासाठी स्वखर्चाने मालेगांवचा ( जोशिंदा ) काढा वाटप करणार आहे. पहिल्या टप्प्यात २० हजार नागरिकांना सदरील काढ्याचा लाभ मिळणार आहे.

अधिक वाचा

राज्यमंत्री ना. अब्दुल सत्तार साहेब यांच्या हस्ते कोविड केअर सेंटरचे उद्घाटन संपन्न

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सिल्लोड तालुक्यातील मंगरूळ फाटा येथील सलीममीया मदरसा तसेच शिवना येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उभारण्यात आलेल्या कोविड सेंटरचे उद्घाटन करतांना महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री ना. अब्दुल सत्तार साहेब व उपस्थित पदाधिकारी, मान्यवर.

अधिक वाचा

अजिंठा येथे शिवसेना व युवासेनेच्या वतीने निर्जंतुकीकरण मोहीम

सिल्लोड तालुक्यातील अजिंठा येथे गेल्या दोन दिवसांपासून कोरोनाचे १३ नवीन रुग्ण वाढले त्या अनुषंगाने कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून राज्यमंत्री अब्दुल सत्तार साहेबांच्या निर्देशाने शिवसेना व युवसेनाच्या वतीने संपूर्ण गांवात निर्जंतुकीकरण करण्यासाठी हायप्लोक्लोराईड व धुर फवारणी करण्यात आली. या उपक्रमाचे उदघाटन राज्यमंत्री अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते सम्पन्न झाला.

अधिक वाचा

श्रावणबाळ, संजय गांधी निराधार योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या ७२५ संचिका मंजूर

राज्यमंत्री ना.अब्दुल सत्तार साहेबांच्या निर्देशाने  संजय गांधी निराधार योजनेच्या ३२७,  तर श्रावण बाळ योजनेच्या ३९८ अशा एकूण ७२५ पात्र लाभार्त्यांच्या संचीकांना मंजुरी देण्यात आली आहे.

अधिक वाचा

कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी सिल्लोड येथे बैठक संपन्न

ग्रामीण भागात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सिल्लोड व सोयगांव तालुक्याची संयुक्त आढावा बैठक सिल्लोड येथे राज्यमंत्री ना.अब्दुल सत्तार  साहेबांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी  खबरदारीचे उपाय म्हणून प्रभावी उपाय योजना करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित विभागांना दिले

अधिक वाचा

धुळे येथे कोरोना विषाणू संदर्भात सध्य स्थिती व त्यावर उपाय योजना करण्यासाठी आढावा बैठक

महसूल, ग्रामविकास राज्यमंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अब्दुल सत्तार साहेब यांनी आज धुळे येथे कोरोना विषाणू संदर्भात सध्य स्थिती व त्यावर उपाय योजना करण्यासाठी  आढावा बैठक घेतली. कोरोनाचा भविष्यातील धोका पाहता खबरदारी चा उपाय म्हणून तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यात यावे अशा सूचना ना.अब्दुल सत्तार साहेब यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. आरोग्य विभागातील रिक्त …

अधिक वाचा