भारतीय हवाई दलामध्ये विविध पदांसाठी पदभरती.

भारतीय हवाई दलामध्ये विविध पदांसाठी पदभरती करण्यात येत आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. जाहिरात व पदाविषयी अधिक माहितीसाठी कृपया उमेदवारांनी २७ डिसेंबरचा एम्प्लॉयमेंट न्यूजपेपर बघावा व आपले अर्ज दिनांक २५ जानेवारी २०१५ पूर्वी सादर करावेत. अन्य शासकीय नोकरी संदर्भातील अधिक माहितीसाठी कृपया www.abdulsattar.in या संकेत संकेतस्थळाला वेळोवेळी भेट दयावी.

अधिक वाचा

गांधी भवन सिल्लोड येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी.

समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांची जयंती सिल्लोड येथील गांधी भवन येथे साजरी करण्यात आली या प्रसंगी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार तसेच कॉंग्रेस पक्षाचे इतर कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

अधिक वाचा

सिल्लोड येथे सहा हजार रुग्णांची तपासणी.

आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सिल्लोड येथे राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण समिती औरंगाबाद व नगरपरिषद सिल्लोड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य सर्वरोग निदान शिबीर तसेच मोफत शस्त्रक्रिया व कृत्रिम भिंगारोपण शिबिरांतर्गत सहा हजार रुग्णांची तपासणी करण्यात आली असून ११५ रुग्णांनाचष्मे वाटप करण्यात आले आहेत.

अधिक वाचा

आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते मोफत शिबिराचे उद्घाटन

आ.अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्त सिल्लोड येथे नगरपरिषद सिल्लोड व राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण समिती औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य सर्वरोग निदान शिबीर तसेच मोफत शस्त्रक्रिया व कृत्रिम भिंगारोपण शिबिराचे आयोजन करण्यात आले. बुधवारी या शिबिराचे उद्घाटन आ. अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आले. सदरील शिबिरामध्ये ३०० रुग्णांची तपासणी करून ७५ रुग्णांवर मोफत शत्रक्रिया करण्यात आल्या.

अधिक वाचा

उरूस संदल मिरवणुकीमध्ये आ. अब्दुल सत्तार सहभागी.

खुलताबाद येथील हजरत ख्वाजा शेख मुन्तोजबोद्दिन उर्फ जरजरी जर बक्ष उरुसास संदल मिरवणुकीने सुरुवात झाली. सदरील मिरवणुकीस आ. अब्दुल सत्तार साहेब व इतर मान्यवर उपस्थित होते.

अधिक वाचा

आ. अब्दुल सत्तार साहेबांतर्फे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत.

दुष्काळ व नापिकीला कंटाळून सिल्लोड तालुक्यातील हट्टी येथील शेतकरी काशिनाथ जयाजी जरारे यांनी आत्महत्या केली. याप्रसंगी आ. अब्दुल सत्तार साहेबांनी आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याच्या कुटुंबियांना सांत्वनपर भेट दिली व या कुटुंबास आर्थिक सहाय्य म्हणून वैयक्तिक पन्नास हजार रुपयाच्या मदतीची घोषणाही केली आहे.

अधिक वाचा

आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन.

आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून फर्दापूर येथील माणिकराव पालोदकर विद्यालयात २९ डिसेंबर रोजी विविध स्पर्धा घेण्यात आल्या.

अधिक वाचा

आ.सत्तार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त रोग उपचार शिबिराचे आयोजन.

नगरपरिषद सिल्लोड व राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण समिती औरंगाबाद यांचे संयुक्त विद्यमाने आ.अब्दुल सत्तार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त सिल्लोड येथे ३० डिसेंबर २०१४ ते १ जानेवारी २०१५ या कालावधीत भव्य सर्वरोग निदान तसेच मोफत शस्त्रक्रिया व कृत्रिम भिंगारोपण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सर्वांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.

अधिक वाचा

आ.अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमाचे आयोजन.

आ.अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्त सिल्लोड येथे नगरपरिषद सिल्लोड व राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण समिती औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य सर्वरोग निदान शिबीर तसेच मोफत शस्त्रक्रिया व कृत्रिम भिंगारोपण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

अधिक वाचा