Archive for मे, 2015

आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या उपस्थितीत महाराणा प्रताप जयंती हर्षोल्हासात साजरी.

आ. अब्दुल सत्तार साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत सिल्लोड येथील महाराणा प्रताप चौकात महाराणा प्रताप यांची जयंती साजरी करण्यात आली. आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी कॉंग्रेस पक्षाचे पदाधिकारी व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

अधिक वाचा

आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार.

सिल्लोड तहसील बहुउद्देशीय ग्रामीण सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी दादाराव पंडित तर उपाध्यक्षपदी शेख नाजीम शेख जिलानी यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल आ. अब्दुल सत्तार साहेब व प्रभाकररावजी पालोदकर यांच्या हस्ते सिल्लोड येथील गांधी भवनमध्ये त्यांचा सत्कार करण्यात आला.

अधिक वाचा

आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते मराठी पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार.

आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते सिल्लोड येथे सिल्लोड तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी राजेश चौबे तर सचिवपदी प्रशांत क्षीरसागर यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. या सत्कार प्रसंगी माजी जि.प. अध्यक्ष प्रभाकररावजी पालोदकर यांच्या समवेत इतर मान्यवरही उपस्थित होते.

अधिक वाचा

जिनिंग प्रेसिंग निवडणूक बिनविरोध.

सिल्लोड तालुका जिनिंग प्रेसिंग संस्थेच्या संचालक निवडणुकीत आठ उमेद्वारांनी आपले अर्ज मागे घेतल्यामुळे संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध झाली व पुन्हा एकदा आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी या निवडणुकीत वर्चस्व मिळविले.

अधिक वाचा

जिल्हा बँकेतील विजयाबद्दल आ. अब्दुल सत्तार साहेब सन्मानित.

औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदाच्या निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्याबद्दल सिल्लोडचे आ. अब्दुल सत्तार साहेब व ज्येष्ठनेते प्रभाकररावजी पालोदकर यांचा सत्कार करण्यात आला.

अधिक वाचा

आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या विजयाबद्दल सिल्लोड येथे फटके फोडून जल्लोष.

औरंगाबाद जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीमध्ये माजी मंत्री व आ. अब्दुल सत्तार साहेब तसेच प्रभाकाररावजी पालोदकर विजयी झाले. विजयाची बातमी कळताच कार्यकर्त्यांनी सिल्लोड येथील गांधी भवन कार्यालयासमोर फटके फोडून आनंद साजरा केला.

अधिक वाचा

कामगारांच्या श्रामावरच प्रगती अवलंबून- आ. अब्दुल सत्तार.

कामगार दिनाचे औचित्य साधून नगरपालिकेतील कामगारांचा सत्कार आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बोलतांना ते म्हणाले कि कामगारांच्या श्रमशक्तीवरच सर्वांची प्रगती अवलंबून आहे.

अधिक वाचा

आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न|

आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते सिल्लोड तहसील प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी नेपाळ मधील भूकंपग्रस्तांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या कार्यक्रमास माजी जि. प. अध्यक्ष प्रभाकाररावजी पालोदकर, उपविभागीय अधिकारी चुन्नीलाल कोकणी, तहसीलदार राहुल गायकवाड, युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अब्दुल समीर व इतर नागरिक उपस्थित होते.

अधिक वाचा

नेपाळ भूकंपग्रस्तांना एक कोटीपेक्षा जास्त मदत देणार- आ. अब्दुल सत्तार.

व्यापारी संघाची बैठक सिल्लोड येथे आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या अध्यक्षतेखाली पार पडली, या बैठकीमध्ये सिल्लोड-सोयगाव विधानसभा मतदार संघातून नेपाळमधील भूकंपग्रस्तांना एक कोटीपेक्षा जास्त मदत गोळा करून देणार असल्याचे माजी मंत्री आ. अब्दुल सत्तार साहेब यांनी जाहीर केले.

अधिक वाचा

मृत विद्यार्थ्याच्या कुटुंबीयास आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते मदत.

आ. अब्दुल सत्तार साहेब व प्रभाकररावजी पालोदकर यांच्या हस्ते हळदा येथील वसंतदादा पाटील महाविद्यालयातील दोन वर्षापूर्वी मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थी गणेश कडूबा पवार यांच्या वडिलांना राजीव गांधी विद्यार्थी अपघात विमा योजनेतून पंचाहत्तर हजार रुपयांची मदत देण्यात आली.

अधिक वाचा