खेळामुळे राष्ट्रीय एकात्मता व शारीरिक सुदृढता मिळण्यास मदत- आ.अब्दुल सत्तार.

lokpatra (2)
जालना जिल्हा युवक कॉंग्रेस अध्यक्ष अब्दुल समीर यांच्या वाढदिवसानिमित्त सिल्लोड येथे न्यू युथ क्रिकेट क्लब व सुपर ट्रेलर्स यांच्या वतीने राज्यस्तरीय लेदर बॉल टी-२० क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन आ. अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास आंतरराष्ट्रीय ख्यातीचे क्रिकेट खेळाडू इकबाल सिद्दीकी उपस्थित होते. उद्घाटन प्रसंगी अब्दुल सत्तार साहेब म्हणाले की, खेळ हे राष्ट्रीय एकात्मता व बंधुत्वाला प्रेरणा देणारे ठरते त्याचप्रमाणे खेळातून निरोगी शरीर प्राप्त होते.