पूरग्रस्तांना मदत.

samachar
महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सिल्लोड-सोयगाव तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त गावांना भेटी देऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली. जालना लोकसभा युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार यांच्या वतीने बनकिन्होळा येथील जवळपास सत्तर पूरग्रस्त कुटुंबियांना प्रत्येकी दहा हजार रुपये रोख, धान्य व चादरीचे वितरण राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आ. अब्दुल सत्तार साहेब व कॉंग्रेस पक्षाचे इतर मान्यवर उपस्थित होते.