भाजपा थोड्याच दिवसाचे सरकार- अब्दुल सत्तार.

Lokmat (2)
भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या १२५ व्या जयंतीचा कार्यक्रम, कॉंग्रेस पक्ष सदस्य नोंदणीचा कार्यक्रम व त्याच प्रमाणे अब्दुल सत्तार साहेब यांच्या सत्काराचा कार्यक्रम औरंगाबाद येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमामध्ये बोलतांना अब्दुल सत्तार साहेब म्हणाले कि, भाजपा सरकार हे राष्ट्रवादीच्या आधारावर अवलंबून असून ते कधी कोसळेल याचा नेम नाही त्यामुळे कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पराभवामुळे खचून न जाता आगामी निवडणुकीच्या तयारीला लागावे असे आवाहन ही त्यांनी यावेळी केले.